Former Chief Minister Pratap Singh Rane Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Assembly Election: प्रतापसिंह राणेंची माघार, काँग्रेसकडून 'हा' उमेदवार रिंगणात

याच पाश्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Former Chief Minister Pratap Singh Rane) यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. गोव्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी सर्वच पक्ष निकराने प्रचार करत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसने 40 जागांपैकी 17 जागा मिळवल्या होता. त्यावेळी सर्वाधिक आमदार कॉंग्रेसचे होते. परंतु राज्यातील या त्रिशंकू लढतीमध्ये कॉंग्रेसला गाफील ठेवत भाजपने सत्ता स्थापन केली होती. (Former Goa Chief Minister Pratap Singh Rane Has Withdrawn From The Election)

याच पाश्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Former Chief Minister Pratap Singh Rane) यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. मात्र यावर तोडगा काढत निवडणुकीपूर्वी काँग्रेसने 2 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. आणि यात पर्ये मतदारसंघातून रणजीत राणे यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, कॉग्रेसचे जेष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी पर्येमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. प्रतापसिंह राणेंचा सामना हा भाजपमधील (BJP) त्यांच्याच सूनबाई दिव्या राणे (Divya Rane) यांच्याशी होणार होता. मागील काही दिवसांपूर्वीच मुलाच्या विरोधात निवडणुक लढविण्याची घोषणा करणारे प्रतापसिंह राणे आता सुनेच्या विरोधात लढणार असल्याने अवघ्या राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले होते. परंतु राणे यांनी ऐनवेळी सर्वांनाच धक्का दिला.

तसेच, प्रतापसिंह राणे यांनी मुलाच्या विरोधात पर्ये मतदार संघातून निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने तात्काळ राणे यांना पर्ये मतदार संघातून उमेदवारी घोषित केली. तर दुसरीकडे भाजपने राणे यांचे पुत्र आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना वाळपाई आणि त्यांचीच सूनबाई दिव्या राणे यांना पर्ये मतदार संघातून उमेदवारी दिली. यामुळे राणे आता मुलाच्या विरोधात नाही तर सुनेच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. आज मात्र राज्यातील राजकीय नाट्यात मोठी भर पडली. राणे यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केली. त्यांनी यावेळी वाढत्या वयाचे कारण देत निवडणुक लढविण्यासाठी नकार दिला.

शिवाय, राणे नुकतेच पर्ये मतदार संघातील जागृत देवीच्या मंदिरात जावून दर्शन घेऊन कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने राज्यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे राणे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याच्या चर्चेलाही ब्रेक मिळाला होता. असं असताना राणे यांनी आज मोठा बॉम्ब फोडत कॉंग्रेससह राज्यातील राजकीय नेत्यांना धक्का दिला. यावेळी त्यांनी कुटुंबामधून कोणत्याही स्वरुपाचा दबाव नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मात्र दुसरीकडे प्रतापसिंह राणे यांनी आगामी निवडणुक लढणार नसल्याचे सांगितल्याने कॉंग्रेसची पंचाईत झाली आहे. ऐनवेळी कॉंग्रेसला आता दुसऱ्या तेवढ्याच ताकदीच्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT