Ex.CM Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही : पार्सेकर

चर्चेसाठी येणाऱ्या भाजप नेत्यांनी ताठ मानेने समोर येण्याचं पार्सेकरांचं आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी : मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. ज्यांना माझ्यासोबत चर्चा करायची आहे त्यांनी ताठ मानेने चर्चेला यावं. मी चर्चेला तयार आहे, पण कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकरांनी भाजप सोडून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेकांनी आपण पार्सेकरांशी बोलणी करत असून त्यांची समजून काढू अशा प्रकारची वक्तव्य केली होती. (Laxmikant Parsekar News Updates)

लक्ष्मीकांत पार्सेकरांनी या सर्वच चर्चा आणि शक्यतांना पुर्णविराम लावला आहे. आपल्याशी कुणीही चर्चेसाठी आलेलं नाही. ज्यांना यायचं असेल त्यांनी ताठ मानेनं चर्चेला यावं, अशा शब्दात पार्सेकरांनी भाजप नेत्यांना आव्हान दिलं आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Elections) भाजपने लक्ष्मीकांत पार्सेकरांना त्यांच्या मांद्रे मतदारसंघात डावलून दयानंद सोपटेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच सध्याचं भाजप सरकार ज्येष्ठ नेत्यांना डावलतंय का अशा चर्चाही सुरु झाल्या होत्या. भाजपने तिकीट नाकारल्याने अनेक नाराज नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरल्याचं चित्र आहे.

दरम्यान मला मुख्यमंत्री (CM) किंवा मंत्री होण्यासाठी आमदारकीचं तिकीट नको आहे. त्यामुळे पुन्हा भाजपमध्ये (BJP) जाण्याचा प्रश्नच उद्धवत नाही, अशा शब्दात पार्सेकर यांनी भाजपमध्ये पुन्हा येण्याच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. पक्षासाठी आपण आजपर्यंत खूप केलं आहे, आता जनतेसाठी काम करत राहणार, असं म्हणत आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT