'मगोच्या बँक खात्यात घोटाळा नाही' : ढवळीकर

मगो पक्षच विधानसभेत नेतृत्व करणार, सुदिन ढवळीकरांना विश्वास
MGP Sudin Dhavalikar
MGP Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

मडकई : कार्यकर्त्यांच्या बळावर यावेळेला मगो पक्ष विधानसभेत नक्कीच नेतृत्व करील, असा दावा करताना भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थापन केलेला मगो पक्ष हा कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा पक्ष असून आजही ज्येष्ठ नागरिकांना मगो पक्षाबद्दल आस्था आहे, आपुलकी आहे, त्यामुळेच या पक्षाचे अस्तित्व आजही टिकून राहिले असल्याचे भावनिक उद्‍गार मगो पक्षाचे नेते तथा मडकई मतदारसंघाचे उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी काढले. बांदोडा येथे बुधवारी मगो पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे समई प्रज्वलित करून उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी मडकई मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, पंचसदस्य आणि इतर नागरिक उपस्थित होते. (Sudin Dhavalikar News Updates)

सुदिन ढवळीकर म्हणाले की, मगो पक्षाला ज्याप्रमाणे गोमंतकीयांचा पाठिंबा आहे, त्याचप्रमाणे देवदेवतांचाही आशीर्वाद आहे. मगो (MGP) पक्ष हा गोव्याच्या मातीतील पक्ष आहे, त्यामुळेच आजही हा पक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेमामुळे आणि मगो प्रेमीच्या आपुलकीमुळे टिकून राहिला आहे. गोव्याच्या विकासासाठी मगो पक्ष कटिबद्ध आहे, असे सांगताना केवळ मडकईतच नव्हे तर राज्यातील इतर मतदारसंघातही मगो पक्षाच्या आणि युतीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

हितचिंतकांकडून देणगी

मगो पक्षाच्या बँक (Bank) खात्यात कोणत्याही प्रकारचा घोटाळा नाही, असे सांगताना मगो पक्षाला हितचिंतकांकडून मिळणारी देणगी बँक खात्यात जमा होते, ती ढवळीकर कुटुंबीय किंवा मगो पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या बँक खात्यात नाही, असे सांगताना काँग्रेसच्या उमेदवाराने केलेला आरोप खोटा असून अशाप्रकारचा खोटारडेपणा कदापि सहन केला जाणार नाही, असे प्रत्युत्तर सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दिले. दाते मुद्दामहून मगो पक्षाला देणगी देतात, कुणाकडे मागायचा प्रश्‍नच नाही असे सांगून मगो पक्षाच्या बँक खात्यासंबंधी वेळोवेळी ऑडिट केले जाते, आणि सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. मगोच्या बँक खात्यात एक कोटी नव्हे, तर दोन कोटी रुपये जमा आहेत, असे सांगून बँक खात्यातील प्रत्येक हिशेब द्यावा लागतो, पंधरा दिवसांचा बाँड अशा पैशांसाठी असतो, आणि तो योग्यवेळी वापरला नाही, तर सरळ पंतप्रधान रिलिफ फंडासाठी जातो, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com