BJP  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे गोवा भाजपचे सर्व कार्यक्रम स्थगित

गोवा भाजपाने आपले पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत, अशी माहिती तानावडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. या पार्श्भूमीवर गोवा भाजपाने आपले पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. (Lata Mangeshkar BJP Goa)

आज दि. 6 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या (Goa) दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते भाजपाच्या जाहीरनाम्याचे अनावरण केले जाणार होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आभासी मार्गदर्शन सभा आयोजित केली होती. हे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे. तसेच पक्षाचे इतर राज्यस्तरीय कार्यक्रमही स्थगित केल्याचे यात म्हटले आहे. या कार्यक्रमांची पुढील तारीख नंतर कळवली जाईल, असे तानावडे यांनी सांगितले आहे आहे. राज्य सरकारकडून 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार होते. ते सांगे मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई, केपे मतदारसंघातील भाजपचे (BJP) उमेदवार उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांचा प्रचार करणार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT