फातोर्डा भाजप (BJP) मंडळात फूट Dainik Gomantak
गोवा निवडणूक

निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपमधील वाद अधिक तीव्र

फातोर्डा भाजप (BJP) मंडळात फूट, दोन्ही सरचिटणीस प्रमोद नाईक (Pramod Naik) आणि मंदार सावर्डेकर (Mandar Savardekar) हे दोघेही चढल्याने मंडळातील मतभेद उघड झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: फातोर्डाचे माजी आमदार आणि भाजप (BJP) राज्य कार्यकारिणीचे सरचिटणीस दामू नाईक यांना फातोर्डा भाजप मंडळातूनच होणारा विरोध निवडणुकीच्या तोंडावर अधिकच तीव्र झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर फातोर्डा भाजप मंडळाचे दोन्ही सरचिटणीस प्रमोद नाईक (Pramod Naik) आणि मंदार सावर्डेकर (Mandar Savardekar) हे दोघेही चढल्याने मंडळातील मतभेद उघड झाले आहेत.

यातच भर म्हणून भाजयुमोचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य रघुवीर शिरोडकर यांनीही या व्यासपीठावर चढून बक्षीस स्वीकारले. सध्या फातोर्डा भाजप मंडळात हा चर्चेचा विषय ठरला असून या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी तोंडी तक्रार प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे केल्याची माहिती मिळाली आहे.

यापूर्वी प्रमोद नाईक आणि मंदार सावर्डेकर यांनी सदानंद तानावडे आणि सतीश धोंड यांची भेट घेऊन फातोर्डात दामू नाईक यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. शिरोडकर यांचाही नाईक यांना विरोध असल्याचे समजते. यापूर्वी विजय सरदेसाई यांनी फातोर्डात 22 कोटींच्या कामांना चालना दिली होती. त्यावेळी प्रमोद नाईक यांनी त्यांचे जाहीरपणे अभिनंदन केले होते.

हा सारा प्रकार म्हणजे पक्षविरोधी कारवाई असल्याचे मत फातोर्डा भाजप मंडळातील काही सदस्यांनी केली असून यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे तोंडी तक्रारही केली असल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी मंडळ अध्यक्ष मनोहर बोरकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. रघुवीर शिरोडकर यांना विचारले असता, मी कोणतेही पक्षविरोधी काम केलेले नाही. नरकासुर स्पर्धेत भाग घेणे आणि मिळालेले बक्षीस स्वीकारणे म्हणजे पक्षविरोधी काम होत नाही, असे ते म्हणाले.

नाव न घेता दामूंवर शरसंधान

नरकासुर वध स्पर्धेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमोद नाईक यांनी आमदार सरदेसाई यांची खुलेआम स्तुती केली. सरदेसाई हे काम करून घेण्याची धमक असलेले आमदार असून त्यांनी समाजकारणात कधीच राजकारण आणले नाही, असे मत मांडले. दामू नाईक यांचे नाव न घेता काही राजकारणी समाजकारणातही राजकारण आणतात, असा टोलाही हाणला. मी विरोधी पक्षाचा कार्यकर्ता असतानाही सरदेसाई यांनी कुठलेही राजकारण मध्ये न आणता गणपती चित्रशाळेकडे जाणारा रस्ता तयार करून दिला. उलट काही जणांनी त्यात मोडता घालण्याचा प्रयत्न केला, अशी त्यांनी पुन्हा दामू नाईक यांचे नाव न घेता टीका केली.

सरदेसाई यांनी आयोजित केलेला कार्यक्रम सांस्कृतिक स्वरूपाचा होता. त्यात पक्षविरोधी काहीच नव्हते. रवींद्र भवन सर्कलला श्री दामोदराचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी विनाविलंब मान्य केली. पक्षातील काही व्यक्तींविरोधात मत आहे, ही गोष्ट खरी असली तरी मी भाजपच्या विरोधात नाही. मी शेवटपर्यंत भाजपचाच कार्यकर्ता असेन.

- प्रमोद नाईक, सरचिटणीस, फातोर्डा भाजप मंडळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT