गोमंतकीयांच्या वेदना ऐकणे जर "राजकीय पर्यटन" असेल तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी ते करतील - दिगंबर कामत Dainik Gomantak
गोवा निवडणूक

राहुल गांधींच्या गोवा भेटीने पर्यटन अर्थव्यवस्थेला हातभार लागल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार

गोव्यातील भाजप सरकार मागिल दहा वर्षात लोकांना सामाजीक व आर्थिक सुरक्षितता देण्यास अपयशी ठरले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील भाजप सरकार मागिल दहा वर्षात लोकांना सामाजीक व आर्थिक सुरक्षितता देण्यास अपयशी ठरले. असंवेदनशील भाजप सरकारने राज्याला दिवाळखोर करुन लोकांवर आर्थिक आणिबाणी लादली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर भाजप नेत्यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधीच्या गोवा भेटीला "राजकीय पर्यटन" म्हणुन केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामतांनी असंवेदनशील भाजप सरकारने लोकांच्या वेदना ऐकुन न घेतल्यानेच राहुल गांधीना त्यांच्या व्यथा जाणुन घेण्यास भाग पाडले असा पलटवार केला आहे. आज बेजबाबदार वक्तव्ये करणारे बेजबाबदार नेते जन्माला येण्यापुर्वीच कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. आज भाजप नेत्यांनी इतिहासाची पाने वाचणे गरजेचे आहे. गोवा मुक्ती लढा, जनमत कौल, घटकराज्य, कोंकणी राजभाषा तसेच घटनेच्या आठव्या परिशीष्टात कोंकणीचा समावेश या सर्व महत्वांच्या ऐतिहासीक निर्णय व घटनांत कॉंग्रेस पक्षाचेच योगदान आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांसाठी गोवा नेहमीच प्रिय राहीला आहे असे दिगंबर कामत म्हणाले.

आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी नेहमीच गोमंतकीयांच्या भावना व संवेदनांचा आदर केला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकभावनांचा आदर करुन तीन एसईझेड रद्द करण्याची मला परवानगी दिली. परवा आमचे नेते राहुल गांधी यांनी पर्यवरणाला हानी पोचवणारे तीन प्रकल्प रद्द करणे व गोव्याचे कोळसा हब न करण्याचे वचन गोमंतकीयांना दिले. आमच्या नेत्यांनी पोकळ आश्वासने न देता प्रत्येक वेळी दिलेला शब्द पाळला याची आठवण दिगंबर कामत यांनी करुन दिली आहे. कॉंग्रेस पक्ष यापुढे गोमंतकीयांच्या हितासाठीच झटणार असे ते म्हणाले.

भाजपने रू.60 प्रती लिटरचे पेट्रोल, 50 हजार नोकऱ्या, खास राज्याचा दर्जा, महिलांना सुरक्षा अशी अनेक आश्वासने सन 2012 व 2017 च्या निवडणूकांच्यावेळी दिली होती. खाण व्यवसाय सुरू करण्याचे भाजप सरकार सातत्याने सांगत आहे. परंतु, केंद्र व राज्यात सरकारे असुनही दिलेली सगळी आश्वासने "जुमला" ठरली आहेत अशी टीका दिगंबर कामत यांनी केली आहे. मागिल दहा वर्षात " राजकीय प्रचार" करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या भाजपच्या बहुतेक नेत्यांनी जनतेच्या पैशातुन सरकारी पाहुणचार घेतला आहे. त्यामुळे सदर नेत्यांचा गोव्याच्या पर्यटनाला काहीच हातभार लागत नाही हे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. आमचे नेते राहुल गांधींच्या गोवा भेटीने पर्यटन अर्थव्यवस्थेला हातभार लागला हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याने मी डॉ. प्रमोद सावंतांचे आभार मानतो असा टोला दिगंबर कामत यांनी हाणला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Beach Assault Case: बंगळुरुच्या पर्यटकाला अमानुष मारहाण, कळंगुटमधील 'त्या' शॅकचा परवाना निलंबित; सरकारनं उगारला कारवाईचा बडगा

Chandra Gochar 2026: एप्रिल महिन्यात चंद्राची अद्भुत चाल! 19 वेळा नक्षत्र बदलून 'या' 7 राशींना करणार मालामाल; नशिबाचीही मिळणार साथ

Ram Navami Wishes in Marathi: गुरुवारी आली रामनवमी, सुवर्णयोगाची पर्वणी! राम नवमीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश

Delhi Police: 21 अत्याधुनिक शस्त्रे, 200 काडतुसे जप्त, 10 जणांना ठोकल्या बेड्या; पाकिस्तान-बांगलादेश मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश

VIDEO: 'AI मध्ये भारत पुढे, पण क्रिकेटमध्ये आम्हीच भारी', पंतप्रधान मोदींना सुनक यांचं मिश्किल उत्तर; जगाचं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT