Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

झुवारीनगरमधील कॉंग्रेस कार्यालयाचे दिगंबर कामत यांनी केले उद्घाटन

ऑलेन्सियो सिमॉईश यांच्या अरवले कुठ्ठाळी व झुवारीनगर येथील कार्यालयाचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

कुठ्ठाळी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार ऑलेन्सियो सिमॉईश यांच्या अरवले कुठ्ठाळी व झुवारीनगर येथील कार्यालयाचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे उमेदवार ऑलेन्सियो सिमॉईश, बेळगावीचे आमदार तथा कुठ्ठाळीळी मतदार संघाचे काँग्रेस प्रभारी लक्ष्मी हेब्बालकर, वेलसव सरपंच हेंन्रिक डिमेलो, केळीचे सरपंच मारिया सो झा तसेच कुठ्ठाळी गट समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ओलेन्सियो आणि दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी कुठ्ठाळी मतदार संघासाठी जाहीरनामा जारी केला.

ऑलेन्सियो म्हणाले की, हा जाहीरनामा कुठ्ठाळी मतदार संघातील आवाज, मागण्या आणि दुःखाचे प्रतिनिधित्व. करतो म्हणून आम्ही नऊ गाव निहाय जाहीरनामा घेऊन आहोत, जे पर्यावरणाचा नाश, सर्वसमावेशक पायाभूत विकास आणि मूलभूत सुविधा प्रदान करेल. 24 तास पाणी पुरवठा, अखंडित वीज पुरवठा, करण्याची विल्हेवाट, सीव्हरेज ट्रीटमेंट प्लांट, खड्डेमुक्त रस्ते इत्यादी सुविधा देण्याचा वचननामा या जाहीरनाम्यात दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आरोग्याच्या पायाभूत सुविधा, शिक्षण शेतीला चालना देणे, कुठ्ठाळी पर्यटन केंद्र बनवणे ज्याचा प्रत्येक नागरिकाला फायदा होईल आणि कुठ्ठाळीच्या आदिवासी समुदायांचे संरक्षण करणे हे पुढील पाच वर्षात प्राधान्य असेल असे त्यांनी शेवटी सांगितले. दिगंबर कामत म्हणाले की कुठ्ठाळी मतदारसंघ जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे आणि 2022 मध्ये गोव्यात काँग्रेसचे (Congress) सरकार येईल असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बर्च नाईटक्लब अग्नितांडवावरून विधानसभेत गदारोळ; राज्यपालांच्या अभिभाषणावेळी हौदात गेलेल्या विरोधी पक्षातील आमदारांना काढले बाहेर

Pakistan Nuclear Policy: 'पाकिस्तानचा अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच!' अण्वस्त्र धोरणावरुन नजम सेठींचा खळबळजनक दावा; पाकिस्तानी पत्रकारानं उघडलं देशाचं गुपित

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: बड्या नेत्याचा साधेपणा की राजकीय स्टंट? खासदारसाहेब बनले 'डिलिव्हरी बॉय', ब्लिंकिटचा युनिफॉर्म घालून घरोघरी पोहोचवलं पार्सल

शेतीची जमीन अन् क्लबचा धंदा; हणजूण येथील 'त्या' क्लबला प्रशासनाचा दणका, ठोठावला 15 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT