Ashok Chavan with Dharmesh Saglani  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'साखळीत काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा पराभव करणार' : अशोक चव्हाण

काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांनाच लोक निवडून देतील, अशोक चव्हाणांना विश्वास

आदित्य जोशी

साखळी : भाजपने गोव्याची आणि साखळी मतदारसंघाची स्थिती बिकट करुन टाकली आहे. मुख्य रोजगार खाण व्यवसाय बंद केला. सगळीकडे या खाण व्यवसायावर विसंबून असलेले इतर लहान सहान उद्योगही बंद पडले. पर्यायी रोजगार उपलब्ध न केल्याने बेरोजगारी वाढली आहे. भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात कमिशन खाल्ले, भ्रष्टाचार माजवला. स्वत: श्रीमंत बनले आणि जनता गरीबच राहिली. मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात सामान्य माणूस चिडलेला आहे. वैतागलेला आहे म्हणूनच विकासासाठी, रोजगारासाठी काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी यांना लोक निवडून देतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण यांनी साखळी येथे व्यक्त केला. (Ashok Chavan News updates)

साखळीचे काँग्रेस (Congress) उमेदवार धर्मेश सगलानी यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण व मंत्री विश्वजीत पतंगराव कदम यांनी साखळी येथील बाजार परिसरात कॉग्रेसची मिरवणूक काढली. बाजारपेठेत फिरुन दुकानदार , गाळेधारक व इतर सामान विक्रेत्यांची भेट घेऊन कॉग्रेसचे धोरण सांगून परिवर्तनासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.

निवडणूक जाहीरनामा हा निव्वळ जुमला

भाजप हा 'भारतीय जुमला पार्टी' असून भाजपने जाहीर केलेला जाहीरनामा ही निव्वळ जुमलेबाजी आहे. दहा वर्षे भाजपचे (BJP) सरकार असताना मोफत सिलिंडर का दिले नाहीत ?. खाण व्यवसाय सुरु का केला नाही ? निवडणुका आल्या की भाजप फक्त जुमलेबाजी करतो. लोक या जुमलेबाजीला बळी पडणार नाहीत गोव्यात परिवर्तनासाठी गोव्याच्या भवितव्यासाठी पुन्हा एकदा कॉग्रेस सत्तेवर येणार आहे.आत्मविश्वास महाराष्ट्राचे मंत्री अशोकराव चव्हाण यांनी साखळीत व्यक्त केला.

महाराष्ट्राचे मंत्री विश्वजीत कदम म्हणाले धर्मेश सगलानी गटाची साखळी पालिकेत गेल्या आठ वर्षापासून सत्ता असून नगराध्यक्ष म्हणून सगलानी यांनी चांगले काम केले आहे. त्यांचा लोकसंपर्क सर्वसामान्य लोकांशी चांगला आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) दुर्देवाने मुख्यमंत्री झाले. त्यांच्या अपयशामुळे त्यांच्याबद्दल साखळीत तीव्र नाराजी पसरली आहे. असे फिरतान दिसून येते.लोकांना परत भाजप नको असाच सूर सगळीकडे आहे. साखळीच्या व गोव्याच्या भविष्यासाठी कॉग्रेसचे सगलाच निवडून येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT