Devendra Fadnavis criticized Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पत्नीला तिकीट हवे होते म्हणून लोबोंनी सोडला BJP पक्ष

पत्नीला तिकीट हवे आहे आणि तिला ते BJP देणार नाही, हे लक्षात येताच लोबोंनी भाजप सोडला. गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याने त्यांची निराशा

दैनिक गोमन्तक

गोव्यात भाजपचे नेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी सपत्निक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रितिक्रया व्यक्त केली. "स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडला आहे कारण त्यांच्या पत्नीला तिकीट हवे आहे आणि तिला ते मिळणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी भाजप (BJP) सोडला. येथे भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याने त्यांची निराशा होणार आहे," असे फडणवीस म्हणाले.

गोव्यात सर्वत्र राजकीय असंतोष दिसून येते आहे. या पक्षांतरामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये मूळ निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले असून असंतोष निर्माण झाला आहे. कळंगुट मतदारसंघात माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा, राजन घाटे आणि इतर कार्यकर्ते नाराज असून त्यांनी लोबो यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर गावडे यांना पक्षप्रवेश दिल्याने प्रियोळ भाजप मंडळामध्‍ये असंतोष उफाळून आला असून त्‍यांनी गावडे यांच्‍या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध करत सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उपसले आहे. पक्षातर्फे संदीप निगळ्ये यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी प्रियोळ गट मंडळाने लावून धरली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून कालचा दिवस पक्षांतराचा दिवस ठरला. कळंगुटचे भाजपचे माजी आमदार मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रियोळचे माजी अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी भाजपाची वाट धरली, तर मयेचे भाजपाचे माजी आमदार प्रवीण झांट्ये यांनी मगोच्या सिंहाला जवळ केले. याशिवाय फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. पक्षांतरबंदी कायद्याच्या बडग्यामुळे मामलेदार वगळता या आमदारांनी इतर पक्षात प्रवेश करण्यापूर्वी आमदारकीचे राजीनामे विधानसभा सचिव नम्रता उलमन यांच्याकडे सुपूर्द केले. लोबो आणि झांट्ये यांनी आपले राजीनामे सोमवारी तर गावडे यांनी काल राजीनामा सादर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT