Chandrakant Kavlekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

बाबू कवळेकरांना कुड्डी, नुवेतून आघाडी मिळवून देण्‍याचा निर्धार

विकासकामांचा सपाटा आणि खोलामध्ये चालू असलेल्या कामांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी बाबू कवळेकर यांनाच यावेळेस निवडून देणार: शाणू वेळीप

दैनिक गोमन्तक

आगोंद: उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर (Chandrakant Kavlekar) यांना कुड्डी आणि नुवे या खोला पंचायत क्षेत्रातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. या दोन्‍ही ठिकाणी कवळेकर यांना मोठी आघाडी मिळवून देण्‍याचा निर्धार खोलाचे उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई यांनी व्‍यक्त केला. तर, विकासकामांचा सपाटा आणि खोलामध्ये चालू असलेल्या कामांना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी बाबू कवळेकर यांनाच यावेळेस निवडून देणार असे जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप यांनी सांगितले.

बाबू कवळेकर (Chandrakant Kavlekar) यांनी खोल पंचायत क्षेत्रात केलेल्या घरोघरी प्रचारामध्ये शाणू वेळीप, जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष खुशाली वेळीप, पंचसदस्य पंच अजय पागी, गुरु वेळीप, माजी जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप (Krishna Velip), फातर्पा पंच मेदिनी नाईक, बार्शे सरपंच अर्जुन वेळीप (Arjun Velip ), रुपेश प्रभुदेसाई, केपे भाजप मंडलसचिव खुशाली वेळीप आदी उपस्थित होते.

नुवेतील पागीवाडा (Pagiwada Nuvet) येथील श्रीकृष्ण मंदिरात सकाळी दर्शन घेतल्यानंतर घरोघरी प्रचाराला सुरुवात झाली. पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी परत एकदा खोल पंचायत क्षेत्रात मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले खोल पंचायत नेहमीच त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आहे.कवळेकरांना गोव्यातील सर्वांत मोठे मताधिक्‍क्‍य मिळवून देऊ असा निर्धार उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई ( Pandhari Prabhudesai ) यांनी यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले जिथे जिथे आम्ही प्रचाराला जातो तिथे आम्हाला फक्त सकारात्मक प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे, असे ते म्‍हणाले.

शाणू वेळीप यांनी खोला पंचायत क्षेत्रात कवळेकर यांच्या प्रयत्नांमुळे भरघोस विकास झाल्याचे सांगितले. या भागात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्‍याचे काम प्रगतिपथावर असून, कवळेकरांना हे प्रकल्प कसे पूर्ण करायचे याचीपूर्ण जाणीव आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही खोलवासीय त्यांना परत एकदा आमचा आमदार म्हणून निवडून आणुया असे आवाहन त्‍यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

Shocking Video: नशेविरोधात लढणाऱ्या माजी कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल; मेडिकल स्टोरमध्ये घडला रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT