Deepa Talkar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'मान्द्रेचे आमदार मंत्री होवूनही इतिहास घडवणार': दीपा तळकर

मांद्रे भाजपा मंडळ महिला अध्यक्ष दीपा तळकर यांनी पालये मध्ये शेकडो कार्यकर्त्यांना आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांना पाठींबा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदार संघातील भाजपाचे आणि आमदार दयानंद सोपटे यांचे समर्थक नवा नवीन इतिहास घडवण्यास सज्य आहेत. आमदार दयानंद सोपटे हे पुन्हा एकदा मांद्रे मतदार संघातून नवा इतिहास रचणार असा विश्वास मांद्रे भाजपा मंडळ महिला अध्यक्ष दीपा तळकर यांनी पालये मध्ये शेकडो कार्यकर्त्यांना आमदार दयानंद सोपटे यांना पाठींबा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विश्वास व्यक्त केला. आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांनी आपल्या प्रचाराचा श्रीफळ पालये पंचायत क्षेत्रातील श्री. भूमिका मंदिरात ठेवून शुभारंभ केला त्यावेळी शेकडो कार्यकर्त्ये समर्थकांनी स्वताहून उपस्थित राहून आमदार दयानंद सोपटे याना पूर्ण पाठींबा देवून विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, नयनी शेटगावकर, तुये सरपंच सुहास नाईक, प्रदीप परब, सत्यवान पालयेकर, अनंत गडेकर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मांद्रे मतदार संघाचा एक इतिहास आजही उजाळा देत आहे. कि मान्द्रेचा आमदार हा मंत्री झाल्यावर पडतो परत निवडून येत नाही. या विषयी स्थानिक पत्रकारांनी भाजपा मंडळ महिला अध्यक्ष दीपा तळकर याना विचारले असता, इतिहास बदलण्यासाठी मान्द्रेची जनता जी आमदार दयानंद सोपटे यांच्यावर निस्सीम प्रेम करतात ती जनता सदोदित याही पुढे त्यांच्याच सोबत राहून त्याना विजयी करतील मंत्री झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा त्याना विजयी करून नवा इतिहास घडवण्यास आता पासूनच निर्धार करतो असे दीपा तळकर यांनी ठणकावून सांगितले.

मांद्रे मतदार संघातून आजपर्यंत जे आमदार झाले आणि मंत्री झाल्यानंतर निवडणुकीत पराभूत झाले तो दोष त्या त्या मंत्र्यांचा असेल, मंत्र्याची मंत्री पदावर पोचल्यावर त्यांची वागणूक बदलल्याने ते मंत्री आपल्या कर्माने पडल्याचा दावा दीपा तळकर यांनी केला. आमदार दयानंद सोपटे 2022 च्या सरकारत मंत्री असतील आणि 2027 च्या विधानसभेत पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येवून नवा इतिहास हा मांद्रेवासियच घडवणार असल्याचे सांगितले.

दीपा तळकर यांनी पुढे बोलताना जनता ठरवणार आमदाराच्या कामामुळे त्याना मंत्रिपदा आणि पुन्हा 2027 निवडणुकीत विजयी होणार असा विश्वास व्यक्त करून. मागचे मंत्री पडले ते आपल्या अपयशामुळे असा दावा केला. सत्यवान पालयेकर यांनी बोलताना आमदार सोपटे हे गरिबांचा कळवला आहे, त्यात कधीच बदल होणार नाही, यापूर्वीचे जे आमदार मंत्री झाले त्यांनी लोकांची गरिबांची जमिनी खाल्या , गरीबाना लुटले म्हणून त्याचा पराभव करून मान्द्रेवासियानी इतिहास तयार केला असे सांगून आमदार सोपटे हे निवडणुकीत वजयी होवून मंत्री होतील आणि २०२७ च्या निवडणुकीतही विजयी होतील असा दावा केला. आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना लोकांचा विश्वास आणि न सांगता लावत असलेली उपस्थिती याच बळावर आपण विजयी होणार असे सांगून, मतदार संघाचे अनेक प्रश्न आपण सोडवणार असल्याचे सांगितले.

भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी बोलताना काही उमेदवार आपला परभाव आताच मान्य करून नवोदित मतदाराना फसवून पक्षाचे त्यांच्या खांद्यावर शेले घालून त्यांचा विश्वास घात करतात , तेच युवक पुन्हा भाजपात (BJP) सामील होतात त्यावरून सोपटे यांचा विजय हा ऐतिहासिक विजय ठरणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT