Deaf Mute students will promote Goa Assembly Election : Election Commission Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मूकबधीर वक्तृत्वातून देणार मतदानाचे धडे, निवडणूक आयोगाचा स्तुत्य उपक्रम

निवडणूक आयोगाने शक्कल लढवत या मूकबधीर मुलांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. अर्थात ही मुले आपल्या साईन कोड भाषेत बोलतील आणि भाषांतरकार ते काय म्हणताहेत ते इतरांना सांगतील.

दैनिक गोमन्तक

भारतातील निवडणुका जगभरातल्या लोकशाही मानणाऱ्या देशांना नेहमीच प्रेरणादायी ठरल्या आहेत. तरीही  काही पक्ष कार्यकर्ते, नेते यांच्याकडून निवडणुकांमध्ये गैरव्यवहार केले जातात. अशांना आयोगाने दणकेही दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आहेत. यात निवडणूक आयोगाने वेळोवेळी सुधारणाही केल्या आहेत.

गोव्यात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) देशात प्रथमच आगळावेगळा प्रयोग केला जात आहे. राज्यातील दिव्यांग - मूकबधीर मुले वक्तृत्वातून ‘नैतिक मतदान’ या विषयावर बोलणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) कार्यालय आणि संजय स्कूल ऑफ स्पेशल एज्युकेशन यांच्यामार्फत हा उपक्रम बुधवार, 8 डिसेंबर रोजी पर्वरीत होत आहे.

मूकबधिरांना (Deaf Mute) बोलता आणि ऐकताही येते नाही. मात्र, सामान्य माणसाइतकेच ते बुद्धिमान आणि हुशार असतात. आता निवडणूक आयोगाने शक्कल लढवत या मूकबधीर मुलांच्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. अर्थात ही मुले आपल्या साईन कोड भाषेत बोलतील आणि भाषांतरकार ते काय म्हणताहेत ते इतरांना सांगतील. त्यामुळे त्यात रंगत येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ठरलं! दिगंबर कामत, रमेश तवडकर होणार मंत्री; गुरुवारी 12 वाजता राजभवनात शपथविधी सोहळा

Goa Minister Resigned: पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांचा राजीनामा; गुरुवारी तवडकर, कामत घेणार शपथ

Asia Cup 2025: ‘...काही फरक पडत नाही’, भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अक्रमचं मोठं वक्तव्य; पाहा काय म्हणाले VIDEO

Viral Video: ‘डिग्रीची किंमत घटली...’! फिरायच्या नादापायी केलं ट्रक ड्रायव्हरसोबत लग्न; महिलेचा अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Toyota Camry Sprint: हायब्रिड सेडान सेगमेंटमध्ये टोयोटाचा पुन्हा धमाका! स्पोर्टी लूक आणि दमदार फीचर्स 'कॅमरी स्प्रिंट एडिशन' लॉन्च

SCROLL FOR NEXT