सावर्डे: मतदारसंघ हा ग्रामीण मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यातले सावर्डे शहर बऱ्यापैकी विकसित झाले आहे. आणि शेजारीच कुडचडे नगरपालिका असल्यामुळे सावर्ड्याला एक वेगळेच स्वरुपच प्राप्त झाले आहे. पण सावर्डे बरोबरच या मतदारसंघात असलेल्या कुळे, काले, मोले, धारबांदोडा साकोर्डा - दाभाळ या ग्रामपंचायती तशा अविकसित म्हणूनच गणल्या जातात. या मतदारसंघाचे क्षेत्रफळ इतर मतदारसंघापेक्षा जास्त असल्यामुळे उमेदवारांना सध्या पायपीट करावी लागत आहे. सावर्डे (Sanvordem Constituency) मतदारसंघातील लढत सध्या रंगतदार बनत चालली असून दोन अपक्षांच्या कात्रीत सापडलेला भाजप (Goa BJP) असे या लढतीचे वर्णन करावे लागेल. (Crisis in front of BJP of independent candidates in Sanvordem constituency for Goa Assembly Election)
मंत्री म्हणून पाऊसकरांचा सावर्डेशी बराच संपर्क आहे. पण त्याचबरोबर नोकऱ्या न मिळालेले अनेक इच्छुक हे पाऊसकरांच्या विरोधात गेलेले दिसताहेत. तरीपण पाऊसकरांनी गेल्या खेपेला मिळालेली पंधरा हजारांहून अधिक मते त्यांच्या मदतीला धावून येतात, का हे बघावे लागेल. गणेश गावकर यांनी 2012 मध्ये अर्जुन साळगावकर यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. ते यावेळी यापैकी किती मते घेतात, हे बघावे लागेल. खरेतर गणेश गावकर हे कॉंग्रेसचेच (Goa Congress) नंतर ते भाजपमध्ये आले.
वास्तविक सावर्डे हा एकेकाळी मगोपचा बालकिल्ला होता. 1994 पर्यंत या मतदारसंघात मगोपचा सिंह गर्जत होता. पण 1999 साली भाजपचे विनय तेंडूलकर यांनी कॉंग्रेसचे गणेश गावकर यांना पराभूत करून मगोपचे वर्चस्व संपुष्टात आणले.2002 साली पुन्हा तेंडुलकर, 2007 साली अपक्ष अनिल साळगावकर व 2012 साली भाजपचे गणेश गावकर असा या मतदारसंघाचा प्रवास झाला आहे.2017 साली मगोपने विजय मिळवून परत एकदा सावर्डेत प्रवेश केला. काले, कुळे, साकोर्डे, मोले सारख्या ग्रामपंचायतींवर अजूनही मगोपचे बऱ्यापैकी वर्चस्व दिसते आहे. यामुळे भाजपची मते फुटून त्याचा फायदा मगोपला (Goa MGP) होऊ शकतो.
आपतर्फे अनिल गावकर हे रिंगणात असून ते ‘केजरीवाल कार्ड’ घेऊन फिरताना दिसत आहेत. आरजीतर्फे बिपिन नाईक यांनी उमेदवारी दाखल केली असून ते काय परिणाम साधतात, हे पाहावे लागेल. एकूण सात उमेदवार रिंगणात असले तरी भाजप, दोन अपक्ष व मगोपच्या अशी चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.