Covid 19 guidelines Goa Election Commission all you need to know Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कोरोना काळात गोव्यात निवडणूक: ही आहे नियमावली

गोवा विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कोविड-19च्या वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करता विशेष नियमावली जारी केली

Priyanka Deshmukh

पाच राज्याच्या निवडणूकांच्या (Assembly Election 2022) तारखा जाहीर झाल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. या निवडणूकांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी आणि मतदारांसाठी कोविड नियमावली जारी केली आहे. या नियमावली नुसार इतर राज्यांच्या आणि गोवा विधानसभेचीही (Goa Assembly Election 2022) निवडणूक होणार आहे. आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी ही विशेष नियमावली असणार आहे. या निवडणुकांसाठी तब्बल 690 जागांसाठी मतदान होणार आहे. या निडणुकांमध्ये कोरोनाच (Covid-19) मोठं आव्हान आयोगापुढे असणार आहे.

उमेदवारांसाठी नियमावली

  • गोवा राज्याच्या निवडणिकीसाठी (Goa Election 2022) उमेदवारांना 28 लाख रूपये खर्चाची मर्यादा आखण्यात आली आहे.

  • कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येचा विचार करता मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे.

  • सर्व प्रकराच्या रॅलिवर बंदी घालण्यात आली आहे.

  • पाच जणांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची परवानगी आयोगाने दिली आहे.

  • सोशल मिडियावरून जास्तीत जास्त प्रचार करण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.

  • 15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा काढता येणार नाही.

  • कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रावर पुरेशा CRPF तुकड्या तैनात केल्या जातील.

  • सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर मानलं जाईल.

  • त्यानुसार सर्व पात्र अधिकाऱ्यांना कोविड लसिचा बुस्टर डोस दिला जाईल

  • ओमिक्रॉन विषाणूचे वाढते संक्रमण बघता या निवडणूक मोहिमेत कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे.

  • त्याचबरोबर विजयानंतर विजयी मिरवणुकीवर बंदी असणार आहे.

  • सर्व राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाइटवर गुन्हेगारी प्रकरणं प्रलंबित असलेल्या निवडणूक उमेदवारांची सविस्तर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यांना उमेदवार निवडण्याचे कारणही द्यावे लागणार आहे

मतदारांसाठी नियमावली

  • ज्या रूग्णांना कोविडची लागण झाली आहे किंवा जे रूग्ण क्वारंटाइनमध्ये असणार त्यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची करता येणार.

  • ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि 80 वर्षांवरील कोविड-19 पॉझिटिव्ह व्यक्तींनाही बॅलेट पेपरद्वारे मतदान करता येणार आहे.

  • सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक

  • मास्क वापरणे गरजेचे

  • सॅनिटायझर वापरणे आवश्यक असणार आहे.

  • मतदान केंद्रावर गर्दी करता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT