Corrupt leaders in political parties in Goa Dainik Gomantak
गोवा निवडणूक

स्वच्छ प्रशासनाची ग्वाही देणाऱ्या पक्षातही खोगीरभरती!

अरविंद केजरीवाल : गोव्‍यात आमदारांचा घोडेबाजार सुरू असल्‍याचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्‍यात (Goa) 10 ते 20 कोटी देऊन आमदार खरेदी केले जातात. तसेच 100 कोटी देऊन मुख्यमंत्रीपद मिळते, असा गौप्यस्फोट दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी करून एकच खळबळ उडवून दिली. मात्र त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्याचे टाळले असले तरी ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. आतापर्यंत कुणीच लोकांच्या हितासाठी उपोषण करून मुख्यमंत्री झालेला नाही. गोव्‍यात केवळ भ्रष्टाचार माजला आहे, असा आरोपही त्‍यांनी केला. केजरीवाल यांनी काल शनिवारी आपचे नेते ॲड. अमित पालेकर यांची त्यांच्या मेरशीतील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पालेकर यांनी अभिनंदनीय कार्य केले आहे. त्यांनी गोव्यातील जनतेला जागे केले असून ही नव्या राजकीय क्रांतीची सुरूवात आहे. सलग पाच दिवस उपोषण करणे ही चेष्टा नाही. राज्याच्या भल्यासाठी आपला जीव दावणीला लावणे हे जिकरीचे असते. त्यात स्वतःला तर त्रास होतोच पण कुटुंबीयांवरही त्याचा परिणाम होत असतो. याचा अनुभव स्वतः आपण घेतला आहे, असे केजरीवाल म्‍हणाले.

गोव्यातील राजकारणात प्रचंड दूषित झालेले आहे. ते आम्हाला स्वच्छ करायचे आहे. प्रामाणिक राजकारण आणि लोकोपयोगी मुद्यांबाबत सतर्कता ही ‘आप’ची नीती आहे. यापुढील काळातही ती कायम राहील हेच पालेकर यांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यासमोर भ्रष्ट सरकार आणि यंत्रणेला नमावे लागले. हा संपूर्ण गोवेकरांचा विजय असल्याचे केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी पालेकरांच्या प्रकृतीची आस्‍थेने चौकशी करून त्यांना बरे होण्‍यासाठी शुभेच्छा दिल्या.

केजरीवालांच्या या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. ॲड. अमित पालेकर यांचे नाव गोव्यात सुपरिचित आहे. सध्या त्यांनी आप पक्षात आपले बस्तान मांडले आहे. हल्लीच जुने गोवे येथे शायना एनसी यांच्या विवादित घराच्या प्रश्नावरून ते उपोषणाला बसले होते. त्यांचे उपोषण संपल्यानंतर खुद्द केजरीवाल यांनी त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली व गोव्यातील भ्रष्ट राजकारण या उपोषणाच्या निमित्ताने साफ होण्याची ही सुरवात आहे, असे प्रतिपादन केले. समाज माध्यमावरून या उपोषणाच्या प्रकारावर तसेच केजरीवालांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया वाचायला व बघायला मिळतात. ॲड. पालेकर यांनी या आधी एका कथित प्रकरणात अर्जुन पुरस्कार मिळालेल्या एका गोमंतकीय महिलेचे घर बनावट कागदपत्रे तयार करून विकल्याचे त्यांच्यावर आरोप होत आहेत. स्वच्छ प्रशासनाची ग्वाही देणाऱ्या आम आदमी पक्षात गोव्यात फसवणूक व भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांची खोगीरभरती चालू आहे, असेही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.‌

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT