Goa: महिलांना राज्य सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या योजनेची दिरंगाई
वास्को: गोव्यातील महिलांना राज्य सरकार(State Government) तर्फे देण्यात येणाऱ्या योजनेची दिरंगाई करून सरकार एकाप्रकारे महिलांचा छळ करीत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे मुख्य निमंत्रक राहुल म्हांबरे (Rahul Mhambare) यांनी केला. तसेच राज्य सरकार जनतेचा उपयोग निवडणुकीसाठी करीत असून सरकार फक्त योजना आपल्या फायद्यासाठी देत आहे. दिल्लीचे (delhi) मुख्यमंत्री (CM) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) महिलांना त्यांचा हक्क देताना, त्यात त्यांना स्वावलंबी होण्यासाठीही सहकार्य करणार आहे. यापुढे गोव्यातील महिलांना त्याचा हक्क देण्यासाठी आम आदमी पक्ष त्याच्या बरोबर कार्य करणार असल्याची माहिती म्हांबरे यांनी दिली.
शनिवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन होताच त्यांचे गोवा आम आदमी पक्षाचे मुख्य निमंत्रक राहुल म्हांबरे, उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर यांनी स्वागत केले.यावेळी परशुराम सोनुर्लेकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हांबरे म्हणाले की राज्य सरकार तर्फे महिलांना देण्यात येणारी योजना फक्त सरकारचा देखावा आहे. महिलांना देण्यात येणारी योजना योग्य वेळी न मिळाल्यास त्यांना कुटुंब चालविताना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आपने गोव्यातील महिलांसाठी अनेक योजना राबविण्याचा निश्चय केला असून, त्याची सर्व माहिती रविवारी मुख्यमंत्री केजरीवाल नावेली येथे महिला मेळाव्यात जाहीर करणार असल्याची माहिती म्हांबरे यांनी दिली.
आपचे उपाध्यक्ष प्रेमानंद नानोस्कर यांनी सांगितले की सरकार मुद्दामहून महिलांच्या योजनां त्यांना देण्यास वेळ काढत आहे. ग्रह आधार योजना चार-पाच महिने उशिरा देणे, लाडलीलक्ष्मी मुलींचे लग्न झाल्यानंतर त्याची मिळकत दोन वर्षानंतर मिळणे ही सर्व कार्यपद्धत चुकीची असून आम आदमी पक्ष यात बदल करून महिलांना स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घेणार आहे. महिलांच्या योजनांना दिरंगाई करणे म्हणजे एका कुटुंबाला त्रास देण्यासारखे असल्याची माहिती नानोस्कर यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.