Digambar Kamat Congress Dainik Gomantak
गोवा निवडणूक

सरकार स्थापनेत भाजप अपयशी, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा : काँग्रेसची मागणी

गोव्यात भाजपविरोधात मतदान झाल्याचा दिगंबर कामत यांचा दावा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात मतदान भाजपविरोधात झाले आहे. पण भाजपला मतविभागणीचा फायदा झाला म्हणून आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. मात्र भाजपमध्ये सारंकाही आलबेल नसल्यानेच अजूनही सत्तास्थापन होऊ शकलेलं नाही, असा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी केला आहे. राज्यपालांनी वेलकाढूपणाची भूमिका घेऊ नये, असं आवाहनंही त्यांनी केलं आहे.

गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत (Goa Election) भाजपला 20 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पी. चिदंबरम यांनीही गोव्यात काँग्रेसचा (Congress) पराभव झाल्याचं मान्य करत गोव्याच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करत असल्याचं म्हटलं होतं. आता निकालानंतर पहिल्यांदाच काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्यामुळेच अजून सरकार स्थापन झाले नाही. राज्यपालांनी आणखी वेळ काढू नये, असं आवाहन काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी केलं आहे. गोव्यात भाजपला 20 जागा मिळाल्यानंतर 3 अपक्षांनीही भाजपलाच (BJP) पाठिंबा दिल्याने मॅजिक फिगर गाठण्यात पक्षाला यश आलं आहे. मात्र आठवडा उलटूनही सत्तास्थापन न झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यपालांनी हस्तक्षेप करुन यावर तोडगा काढण्याची मागणी कामत यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

SCROLL FOR NEXT