पणजी: मतदारांनी आपल्याला निवडून आणल्यास आपण कुंभारजुवे मतदारसंघातील युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यास प्राधान्य देणार, असे प्रतिपादन या मतदारसंघाचे तृणमूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार समील वळवईकर यांनी काल ‘गोमन्तक टीव्ही’शी आपल्या प्रचारादरम्यान बातचीत करताना केले.(Congress and BJP's setting in valpoi constituency for goa election 2022)
या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, की या मतदारसंघातील बहुतेक युवक विदेशात रोजगारानिमित्त जातात. कारण येथे रोजगाराच्या संधी त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे येतेच त्यांना कशाप्रकारे रोजगार मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार. सगळ्यांनाच सरकारी नोकरी मिळावी असे वाटते हे खरे असले, तरी तसे शक्य नाही. त्याला बऱ्याच मर्यादा आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांच्या साहाय्याने या प्रश्नावर करण्याचा आपला प्रयत्न असेल. तृणमूल काँग्रेसच्या आश्वासनांबाबत विचारले असता जे विरोधात आहेत त्यांचा हा एक डाव असल्याचे ते म्हणाले. आमच्या पक्षाला अजून येथे संधी मिळालेली नाही. सत्तेवर येण्याची संधी मिळाली तर दिलेली आश्वासने नक्की पूर्ण केली जातील. विद्यमान सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. ओल्ड गोवा (Old Goa) येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन पाळण्यात आलेले नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कुंभारजुवे मतदारसंघातील (Cumbarjua Constituency) मतदार तुम्हालाच निवडून देतील असे तुम्हाला का वाटते असे विचारले असता या मतदारसंघात आपले जे हितचिंतक आहेत त्यांच्या पाठिंब्यावर आपण निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. आपल्याकडे या आधी कोणतेही सत्तेचे पद नव्हते. तरीही आपण आपल्या परीने लोकांची होईल तशी कामे केली. आता जर मतदारांनी मला कौल दिला तर आपण विकासकामे करणार.
‘काँग्रेस आणि भाजपात सेटिंग’
तृणमूल काँग्रेस (Goa TMC) म्हणजे भाजपची ‘बी टीम’ अशी टीका केली जाते याकडे लक्ष वेधले असता वळवईकर यांनी असा आरोप काँग्रेसकडूनच केला जातो, असा दावा केला. काँग्रेसवाल्यांना आमची भीती वाटत असल्यानेच ते अशा अफवा पसरवतात. त्या पक्षाचे 17 आमदार निवडून आले होते, पण ते भाजपात गेले त्याचे काय असा सवाल त्यांनी केला. खरे तर या काँग्रेस पक्षाचा कुंभारजुवे मतदारसंघाचा उमेदवार आहे त्याला भाजपनेच पेरला आहे असा दावा त्यांनी केला. या उमेदवारांच्या चारित्र्याबाबत त्यांनी सवाल उपस्थित केला. कलंकीत अशा बाहेरच्या उमेदवाराला काँग्रेसने उमेदवार म्हणून उभे केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांचे या मतदारसंघात सेटिंग असल्याचा आरोप त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.