TMC-AAPने तापवले गोव्याचे राजकीय वातावरण Dainik Gomantak
गोवा निवडणूक

TMC-AAPने तापवले गोव्याचे राजकीय वातावरण! काँग्रेस-भाजप तणावात

छोट्या पक्षांच्या उपस्थितीमुळे गोवा राज्यात पुन्हा एकदा त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly election) आम आदमी पक्ष (AAP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी भाजप (BJP) आणि विरोधी काँग्रेससह (Congress) छोट्या पक्षांच्या उपस्थितीमुळे राज्यात पुन्हा एकदा त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. मात्र, या राज्यात पक्ष आणि नेत्यांची निष्ठा बदलत राहते, ज्याचा परिणाम सरकारांवर मोठ्या प्रमाणात होतो.

गोव्यात गेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही त्रिशंकू विधानसभा उभी राहिली होती. 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा मिळाल्या होत्या, मात्र असे असतानाही 13 जागा जिंकणाऱ्या भाजपने आघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, भाजपसोबत गोव्यातील स्थानिक पक्षानेही पाच वर्षे सरकार चालवले. मात्र, आता अनेक आमदार पक्ष बदलताना दिसत आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या वेळी बऱ्याच छोट्या हालचाली होत असल्या तरी, छोट्या राज्यांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसून येतो. नुकताच गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार जयंत साळगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते लुइझिन फालेरो यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसही गोव्यात वेगाने प्रवेश करत आहे. फालेरो यांनी नुकताच विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर आम आदमी पक्षही गोव्यात प्रदीर्घ काळापासून सक्रिय आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गोवा दौऱ्याचा सपाटा लावला आहे. आणि त्यांनी गोव्यात येवून अनेक घोषणा आणि आश्वासन देण्यास सुरवात केली आहे. दिल्लीमध्ये राबवत असलेल्या अनेक योजना आणि सोयी सुविधा गोमंतकीयांना देण्याचे आश्वासन आप कडून गोव्यात दिले जात आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप सर्वात बलाढ्य असल्याचे दिसत असले तरी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजप पक्षाकडे प्रसिद्ध चेहऱ्याची उणीव आहे. युवा नेते आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे खूप प्रयत्न करत असले तरी त्यांचे सरकारही आता वादात सापडले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसकडे नेतृत्वक्षमता आणि निर्णयक्षमता दिसून येत नाही त्यामुळे गोव्यातील विरोधी पक्षामध्ये समन्वयाचा अभाव आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यातील प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी होऊन काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष प्रबळ झाले असले तरी गोवा छोटे राज्य असल्याने तेथे अधिक अस्थिरता दिसून येते आहे. अशा स्थितीत मुख्य निवडणूक लढत सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्येच होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोवा राज्यातील 25 टक्के जागा अशा आहेत, ज्यावर छोट्या पक्षांचे वर्चस्व आहे. त्यामुळे गोव्यात तिसऱ्या आघाडीच बिगूल वाजणार की नाही हे येणारा काळातच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT