Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पुढच्या 2 तासात गोव्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार

शनिवारी सायंकाळी 6 पासून 14 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे

दैनिक गोमन्तक

गोवा: सीईओ कार्यालयाने नोटीस जारी केली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आज 12 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता त्यांचा प्रचार संपवला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही राजकीय सभा आयोजित करू नये, तसेच दूरचित्रवाणी, नाट्य प्रदर्शन इत्यादीद्वारे निवडणूक प्रचार सामग्री प्रदर्शित करण्यास सक्त मनाई आहे.

(Candidates ordered to finish campaigning by this evening for goa election 2022)

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी सायंकाळी 6 पासून 14 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान, पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास, मिरवणूक, रॅली आयोजित करण्यास किंवा बैठका आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पैशांचे आणि दारू वाटण्याचे प्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दिवशी निर्वाचन घेतलेली वाहने वगळून उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी दिलेली सर्व वाहने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याकाळात खासगी वाहनांचीही तपासणी होईल. निवडणुकीच्या (Election) कालावधीत बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोव्यातील (Goa) सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने बंद

गोव्यातील (Goa) सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर मतमोजणी 10 मार्च रोजी करण्यात येणार असून या दिवशी देखील गोवा राज्यातील सर्व मद्यविक्री दुकानांना कुलूप असेल, अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी
पुढील काही दिवसात गोव्यासह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पाचही राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्चच्या सायंकाळी 6:30 पर्यंत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT