BJP Leaders  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

मांद्रेच्या विकासासाठी भाजपचे डबल इंजिन सरकार सत्तेवर आणा: श्रीपाद नाईक

केंद्र सरकारने नेहमीच गोव्याकडे विशेष लक्ष दिले आहे, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदार संघाचा विकास गतीने होण्यासाठी डबल इंजिनचे भाजप सरकार सत्तेवर येणे काळाची गरज आहे. त्यासाठी आपले कार्यक्षम आमदार दयानंद सोपटे यांना पुन्हा निवडून द्या, त्यांना मंत्री करा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी पार्से येथील भाजपच्या बैठकीत केले. (Shripad Naik on Mandrem Development)

पार्से पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या या कोपरा बैठकीला व्यासपीठावर भाजपचे मांद्रे मतदार (Candidate) संघाचे उमेदवार आमदार दयानंद सोपटे, पार्सेच्या सरपंच सौ प्रगती सोपटे, पंच सौ ममता सातरडेकरश्री प्रेमनाथ कानोलकर भाजपचे मांद्रे मंडळ अध्यक्ष मधुकर परब,सचिव सुदेश सावंत , तुये चे सरपंच सुहास नाईक,बापू धुरी ,निरीक्षक गोरख मांद्रेकर,राजू राऊत , हरमलचे माजी सरपंच अनंत गडेकर ,सौ दीपा तळकर पार्सेचे माजी सरपंच तथा युवा मोर्चा अध्यक्ष रामा नाईक , विर्नोडा पंच शैलेंद्र परब आदी उपस्थित होते. (Goa Aseembly election News Udpates)

यावेळी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले की, आपले लोकप्रिय आमदार दयानंद सोपटे यांनी थोड्या कालावधित अमर्यादित विकास केला आहे. विकास काय असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. खरं म्हणजे देशाला स्थिर सरकार देणारे भाजप (BJP) राज्याला स्थिर सरकार देवू शकते.

केंद्र सरकारने (Central Government) नेहमीच गोव्याकडे विशेष लक्ष पुरवले आहे. आतापर्यंत विकास कामासाठी 38 हजार कोटी इतका निधी सरकारने गोव्याला (Goa) दिला आहे. पेडणे तालुक्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दयानंद सोपटे यांनाच निवडून द्या, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT