Devendra Fadnavis Dainik Gomantak
गोवा निवडणूक

'गोव्यात पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करणार', फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

काल प्रचाराच्या तोफा थंडावल्याने गोव्यातील (Goa) जनता 14 फेब्रुवारीला मतदान करण्यासाठी सज्ज झाली आहे.

दैनिक गोमन्तक

आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये गोव्याचा देखील समावेश आहे. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्याने गोव्यातील जनता 14 फेब्रुवारीला मतदान करण्यासाठी सज्ज झाली आहे. जनता कुणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पाश्वभूमीवर पुन्हा एकदा गोव्यात प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखाली भाजप (BJP) सरकार सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमाशी बोलताना विश्वास व्यक्त केला आहे. (BJP Will Establish Power In Goa Once Again Fadnavis Expressed Confidence)

ते पुढे म्हणाले, ''साखळी मतदार संघातून गोव्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत निवडणुक लढवत आहेत. आणि मला विश्वास आहे की, ते प्रचंड बहुमताने निवडून येतील. दुसरीकडे विरोधकांनी या मतदार संघात प्रचंड ताकद पणाला लावली आहे. गोव्यातील जनतेचा विकास करण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द आहोत. तसेच आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) गोव्याच इतिहास माहिती नाही. त्यामुळे त्यांनी गोव्याच्या इतिहासाबद्दल बोलूच नये. गोव्यातील जनतेने शिवसेनेला नाकारलेले आहे. गोव्यात पुन्हा एकदा भाजप बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन करणार आहे.''

तसेच ते पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षामध्ये मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यापासून ते आतापर्यंत भाजप सरकारने कोणत्याच धर्माच्या विरोधात निर्णय घेतले नाहीत. भाजप सरकारच्या काळातच गोव्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. तसेच गोव्यातील वाईन विक्रीला आमचा आजही विरोध आहे. राज्यात भाजप सरकारने सर्वसमावेशक निर्णय घेतले आहेत.

तसेच उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना आम्ही तीन पर्याय दिले होते. मात्र त्यांनी आमचे ऐकले नाही. बाबूश मोन्सेरात यांना स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपमध्ये आणले होते. मात्र उत्पलने पक्षाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे की, काही लोक उत्पल पर्रीकरांचा वापर करत आहेत.'

शिवाय ते पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रातील उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यात या सरकारने अराजकतेचे वातावरण निर्माण केले आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकारने पोलिस यंत्रणेचा गैवापर केला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT