Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

उत्पल पर्रीकरांना केवळ वडिलांच्या वारशाचा आधार!

भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रीया

दैनिक गोमन्तक

पणजी: देशभर गाजत असणारा गोवा विधानसभा निवडणुक काल राज्यात पार पडली, पणजीच्या हॉट सीट केवळ राज्यातील नागरिकच नाही तर राज्याबाहेरील लोकही पाहत आहेत, कारण माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपविरुद्ध (Goa BJP) निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांच्यामुळे राज्यात भाजपची ओळख कायम राहिली आहे. आणि त्यांच्या मुलालाच तिकीट नाकारण्यात आले होते. उत्पलचे काका, अवधूत पर्रीकर यांनी मिरामार येथे उत्पलच्या समर्थकांनी उभारलेल्या तंबूत आपली उपस्थिती दाखविला तर पार्श्वगायिका हेमा सरदेसाई यांनी पाठिंबा दर्शवला. या उलट मागील निवडणुकीत अतानासियो 'बाबुश' मोन्सेरातच्या (Babush Monserrate) विरोधात काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी यंदा त्यांचे काम गांभीर्याने घेतले असुन, त्यांचे सर्व मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहेत का? याची खात्री करण्यासाठी यादी तपासत होते.

दरम्यान कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता “आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही मंडळाच्या निर्णयाचा आदर करतो. बाबुश मोन्सेरात यांची काम करण्याची शैली ही वेगळी आहे. उत्पल (Utpal Parrikar) यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. म्हणुनच एकाच टीमसह मतदारसंघात फिरत असतात,” भाजप कार्यकर्ता म्हणाला. "एका कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार उत्पल हे पूर्णपणे त्यांच्या वडिलांच्या वारशावर अवलंबून आहे, परंतु बाबूश लोकांना मदत करत आहेत," ते पुढे म्हणाले, “पणजीत आठवडाभर पाणी नसतं तसेच राज्यात वारंवार पूर येत असतो. दरम्यान, मोन्सेरात यांनी केलेले काम आम्ही विसरू शकत नाही. तसेच ते अडचणींना प्रतिसाद देत असतात आणि गरजेला नेहमीच तत्पर असतात."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT