Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा निवडणूक

बाबूशची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून मनधरणी

भाजप गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुन्हा भाजप कार्यालयात

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र असं असलं तरीही काही उमेदवारांनी निवडून आल्यानंतरही आपली नाराजी उघड केली आहे. बाबूश मोन्सेरात यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या विधानसभा निवडणुकीत आपल्याला साथ दिली नाही, असा थेट आरोप बाबूश यांनी केला आहे. तसंच पक्षाने कार्यकर्त्यांना शिस्त शिकवावी असंही बाबूश म्हणाले. आता भाजप नेत्यांनी बाबूश यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

भाजपने गोव्यात (Goa) सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे आमदारांची नाराजी, तीही बाबूश मोन्सेरात यांच्यासारख्या आमदाराची नाराजी भाजपला परवडणारी नाही. साहजिकच बाबूश यांनी नाराजी व्यक्त करताच देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. पणजीत भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याला पाठिंबा न दिल्याचा आरोप बाबूश यांनी केला आहे.

दरम्यान भाजप (BJP) आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती आहे. पूर्ण बहुमत मिळालं तरीही अपक्ष आणि मगोपच्या आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मगोपने अद्यापही भाजपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. तृणमूल काँग्रेससोबत युती असल्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी चर्चा करुनच मग पाठिंब्याचा निर्णय घेणार असल्याचं मगोपच्या (MGP) सुदिन ढवळीकर यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला 20 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. तसंच गोव्यातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी गोमंतकीय जनतेचे आभारही मानले आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाला गोव्याच्या जततेने निवडून दिलं आहे, आता आम्हीच सरकार स्थापन करु असा दावाही त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT