Goa Elections: भाजप सूत्रांनी दै. ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, दिलायला लोबो (Delilah Lobo) यांना शिवोलीमध्ये अपक्ष म्हणून लढण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिली आहे. मायकल लोबो गेले दोन महिने या संदर्भात पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असून, सुरवातीला गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना फारसे खिजगणतीत घेतले नव्हते. परंतु अमित शहा यांनी स्वतः आपल्या यंत्रणेमार्फत शिवोलीचा सर्वे केला असता त्यात मायकल लोबो (Michael Lobo) यांचे वर्चस्व आढळून आले. त्यांनी भाजपच्या नेत्यांना त्यानुसार कळवले आहे. या नवीन व्यवस्थेनुसार दिलायला लोबो यांना अपक्ष म्हणून शिवोलीतून लढण्यास मान्यता देण्यात आली.
‘तो’ उमेदवार गळाला?
भाजपने जिंकण्याजोग्या अनेकांना पक्षाचे दरवाजे खुले केले आहेत आणि त्यात मुख्यमंत्र्यांचे विरोधक गणले गेलेले रोहन खंवटे यांचा समावेश आहे. यावरून पक्ष किती सूत्रबद्धरितीने पावले टाकतोय याचे संकेत मिळतात. बार्देशमधील कॉंग्रेसच्या अस्तित्वालाही धक्का बसला आहे. म्हापशाचा कॉंग्रेसचा उमेदवार भाजपच्या गळाला लागतोय की काय? याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.