Vishwajit Rane
Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

विश्वजीत राणेंनी परस्परच घेतली राज्यपालांची भेट; 'भाजप'मधील मतभेद उघड?

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा निवडणुकीत मतदारांनी कॉंग्रेसला डावलून भाजपला पसंती दिली. राज्यात भाजपने 40 पैकी 20 जागांवर भगवा फडकवला. मात्र, मुखमंत्री पदावरून पक्षात अंतर्गत वाद सुरू आहेत का? अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. (Vishwajit Rane BJP News)

प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असले तरी विश्वजित राणे देखील या शर्यतीत असल्याचे अनेक राजनैतिक जाणकार सांगतात. यातच राणे यांनी परस्पर राज्यपालांची भेट घेतली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तसेच चर्चेला उधाण आले आहे.

प्रमोद सावंत विधीमंडळ गटनेते असले तरीही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी विरोध होण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. त्यामुळे विश्वजीत राणे (Vishwajit Rane) मुख्यमंत्रीपदासाठी दावा करु शकतात. विश्वजीत राणेंनी असा पवित्रा घेतल्यास मात्र भाजपसमोर (BJP) मोठा पेच निर्माण होऊ शकतो.

साखळी मतदारसंघात डॉ. प्रमोद सावंत यांचा अगदी कमी फरकाने विजय झाला आहे. काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांनी मुख्यमंत्री सावंतांना (Pramod Sawant) कडवी झुंज दिल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री निवडून आले असले तरीही त्यांना ही निवडणूक सोपी गेली नाही हे निश्चित. मात्र विश्वजीत राणेंनी अगदी सहजपणे विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना 12250 मतं मिळाली असून काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांना 11584 मतं मिळाली आहेत. प्रमोद सावंत फक्त 666 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. दुसरीकडे वाळपई मतदारसंघात विश्वजीत राणेंना 14462 मतं मिळाली आहेत, त्यांच्यासमोर रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या मनोज परब यांचं तगडं आव्हान मानलं जात होतं. पण मनोज परब यांना 6377 मतं पडल्याने विश्वजीत राणे 8,085 एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT