BJP Leader Babu Ajgaonkar alligation on Goa Former CM Digambar Kamat Dainik Gomantak
गोवा निवडणूक

पाकिटे पुढे सरकवून अन् बिर्याणी वाटत 27 वर्ष कामतांनी मडगाववर राज्य केले

दैनिक गोमन्तक

मडगाव: राज्यात काल विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले, यानंतर राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्राला सुरवात झाली आहे. कालच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि बाबू अजगावकर यांच्यात काल वादाची ठिणगी पेटली.(BJP Leader Babu Ajgaonkar alligation on Goa Former CM Digambar Kamat)

"गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मागील सत्तावीस वर्ष मडगाववर राज्य करत मडगावकरांना मूर्ख बनवत आहेत; असा सनसनाटी आरोप भाजप नेते बाबू अजगावकर (BJP Leader Manohar Ajgaonkar) यांनी काल केला. मडगावकरांना खोटी आश्वासने देत, सतत जनतेचा विश्वासघातच केला आहे. मडगाव (Margao) मधील सर्वत्र चर्चेत असणाऱ्या कब्रस्थान प्रकरणात मुस्लिम बांधवांना दिगंबर कामत यांनी मूर्ख बनवले, मडगाव मधील बेकायदेशीर घरे मी कायदेशीर करेन अशी पोकळ आश्वासने आज पर्यंत कामत यांनी दिली. आणि याच पोकळ आश्वासनांवर आजपर्यंत कामत निवडणूक जिंकत आलेत. त्यांनी लक्षात घ्यावे की, बाबू आजगावकर यांनी दिलेला शब्द खरा उतरवण्याची धमक बाबू आजगावकरकडे आहे." असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मागील 27 वर्षे दिगंबर कामत (Former CM Digambr kamat) यांनी मडगावकरांना केवळ आश्वासनेच दिली मात्र, ती आश्वासने आज पर्यंत सत्यात उतरलेली नाहीत केवळ निवडणुकीच्या दरम्यान घरोघरी जाऊन पाकिटे पुढे सरकवून आणि बिर्याणी वाटून मतदानाची भीक मागत गेली 27 वर्ष त्यांनी मडगाववर राज्य केले. मडगाव मधील गरीब जनतेला जाग आली असून; आज दिगंबर कामतचा खरा चेहरा समोर येणार आहे. मडगावकरांनी ठरवले आहे की, या निवडणुकीत बदल हा घडवून आणलाच पाहिजे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT