Rahul Gandhi Dainik Gomantak
गोवा निवडणूक

भाजपाने खाण बंदीत गोवा चिरडला

राहुल गांधी : खरी लढाई काँग्रेस-भाजपामध्येच; इतर पक्षांना मतदान करून मत वाया घालवू नका

दैनिक गोमन्तक

कुडचडे: गोव्यात खरी लढाई काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. इतर पक्षांना मतदान करून मत वाया घालवू नका. राज्यात 30 ते 35 जागांवर उमेदवार विजयी होऊन केवळ काँग्रेसचेच सरकार येणार आहे असा विश्‍वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. कुडचडे येथे आयोजित आज जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपवर टीका करताना ते म्हणाले, भाजपने खाण बंदीत गोवा चिरडून टाकला. आमचे सरकार येताच गोव्यात कायदेशीर रित्या खाण व्यवसाय सुरू होईल अशी घोषणाही त्यांनी केली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही तास बाकी राहिलेत. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्याचा दौरा करत शुक्रवारी, ता.11 रोजी कुडचडे येथे प्रचार सभा घेतली. व्यासपीठावर काँग्रेसचे कर्नाटक राज्य माजी मुख्यमंत्री देशपांडे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खा.फ्रान्सिस सार्दिन, जेष्ठ नेते पी.चिदंबरम, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, दिनेश गुंडू राव, डॉमनिक फर्नांडिस, श्याम सातार्डेकर, हर्षद गावसदेसाई, बाळकृष्ण होडारकर, एम के.शेख, पुष्कल सावंत, आदी उपस्थित होते.

राहुल म्हणाले, गोव्यातील काँग्रेस सरकार सामान्यांना केंद्रबिंदू मानून चालविले जाईल. भाजपने लघु व्यावसायिकांना देशोधडीला लावले. नोटबंदी करून सामान्यांना संपविले.हे चित्र बदलून टाकण्यासाठी काँग्रेस सत्तेत येण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसने फुटिरांना तिकिट दिली नाही. दिलेल्या वचना प्रमाणे नव्या युवकांना संधी दिली.पूर्ण बहुमताचे सरकार देण्याची हाक गोमंतकीय जनतेला करताना कुडचडे मतदार संघाचा उमेदवार निवडणूक येणार असल्याचे संकेत आजचा उपस्थितीने दाखवून दिली असल्याचे राहुल गांधींनीस्पष्ट केले.

भाजपने गेल्या पाच वर्षांत गोव्यात काहीही काम केलेले नाही आणि आता पंतप्रधान मोदी गोव्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यावरण आणि रोजगार या मुद्द्यांवर ते केवळ खोटी आश्वासने देत आहेत असे सांगताना जाहीरनाम्यात पर्यावरणाबाबत एक अवाक्षरही नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

युवकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली. आता भाजपने मतविभाजनासाठी लहानसहान पक्षाला गोव्यात आणलेय. भाजपच्या डोक्यात चढलेली सत्तेची नशा जनता या निवडणुकीत खाली उतरविणार आहे. मतदारांनी सरकारला धडा शिकवावा.

अलका लांबा, काँग्रेस नेत्या

भाजपा सरकार दिलेले जाहीरनामा गेल्या दहा वर्षात परत परत तेच पुढे करीत आहे. आपण दिलेल्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टीचा समावेश केला आहे. तरीही दहा वर्षे आमदारकी भोगलेल्या आणि पाच वर्षे मंत्री असूनही पाणी समस्या कायम आहे. सर्वप्रथम मी पाणीसमस्या दूर करणार.अमित पाटकर, उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मडगावमध्ये धर्मांतराचा कार्यक्रम? पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत केली पाहणी, काय उघडकीस आलं?

Goa Today's News Live: रणजीत सुयश प्रभूदेसाईचे दणदणीत शतक, 41 सामन्यात झोडली सात शतकं

Mike Mehta: 3 दशकांहून अधिक योगदान देणारे तियात्रकार, ‘गोंयकार’पणाचे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व - माइक मेहता

अग्रलेख: 'वाळू माफिया' अनावर झाल्यास लोकांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे? कुंपणच शेत खाणारी परिस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण; आरोप निश्चित करण्याचे म्हापसा कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT