BJP Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यातील 4 मोठ्या नेत्यांचे भाजपला राम राम

भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले, भाजप राष्ट्रीय पक्ष असून या सगळ्या घडामोडींचा काहीही परिणाम होणार नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या महिनाभरात भाजपच्या चार पर्रीकरप्रेमी आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि आता मये मतदार संघाचे आमदार प्रवीण झांट्ये यांचा समावेश आहे. यात अजून भर पडू शकते. प्रत्येकानी राजीनामा देताना पर्रीकर असते तर ‘हे घडले नसते' असे सांगण्यात कुचराही केली नाही. त्यामुळे एकूणच भाजपच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Goa BJP Latest News)

यासंदर्भात, भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडेंनी आक्रमक प्रतिकिया दिली. ते म्हणाले भाजप राष्ट्रीय पक्ष असून या सगळ्या घडामोडींचा काहीही परिणाम होणार नाही. बार्देस हा काय मायकलने विकत घेतलाय का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.

दरम्यान, मायकल लोबो (Michael Lobo) वगळता भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदारसंघांमध्ये नवीन उमेदवार शोधले आहेत. मायकल लोबो यांना आपली पत्नी डिलायला लोबो यांना शिवोली मतदारसंघातून उमेदवारी हवी होती मात्र पक्षाने ती नाकारल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. कार्लुस अल्मेदा यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एलीना साल्ढाणा यांनी आम आदमी पक्षाची साथ धरली आहे तर प्रवीण झांट्ये मगो पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते.

भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; कार्यकर्तेही नाराज

भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसार काही आमदारांच्या कार्यपद्धतीवर लोक नाराज होते. याशिवाय पक्षश्रेष्ठींना कोणत्याही स्थितीत राज्य गमवायचे नाही, तसे सक्त आदेश प्रदेश समितीला दिले आहेत. म्हणून भाजपने या जागांवर इतर पर्याय शोधले होते. या निवडणुकीत (Election) त्यांना भाजपाची उमेदवारी मिळणार नाही असे स्पष्टही सांगण्यात आले, तरीही चार आमदारांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. कारण या आमदारांचे कार्यकर्ते भाजपवर प्रचंड नाराज आहेत.

पत्नीसाठी हवे होते तिकीट; पक्षाला अमान्य

पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पक्षाची ध्येय धोरणे,निष्ठा आणि त्याग महत्वाचा असतो. उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षांतर करणे योग्य नाही. मायकलला पत्नीसाठी तिकीट हवे होते. ते पक्षाला मान्य नव्हते. बार्देश तालुका मायकलने विकत घेतला आहे काय? येथे भाजपचे (BJP) नेटवर्क उत्तम आहे. बार्देश तालुक्यातील सर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून येतील.

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष भाजप

पूर्वीचा भाजप राहिला नाही

सामान्य कार्यकत्यांवर होणारा अन्याय पाहवत नाही. पक्षातील राजकारण, अंतर्गत मतभेद यामुळे आपण नाराज होतो. म्हणून आपण पक्ष सोडला आहे. पर्रीकर असते तर हे घडले नसते. बार्देश तालुक्‍यातील ७ मतदारसंघांपैकी ६ उमेदवार ‘टुगेदर फॉर बार्देश’ अभियानाचे निवडून येतील.

- मायकल लोबो

प्रश्नांना न्याय मिळाला नाही

या पक्षात आता आमदारांना किंमत दिली जात नाही. मयेतील खाण अवलंबित तसेच कर्मचाऱ्यांचा बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वारंवार मांडला मात्र त्याला न्याय दिला गेला नाही. मतदारसंघाचा विकास भाजपमध्ये राहून होणार नाही हे स्पष्ट झाल्यानेच मी राजीनाम्याचा हा निर्णय घेतला.

- प्रवीण झांट्ये

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT