Babu Kavalekar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

कोण काय बोलतात ते बोलू द्या: बाबू कवळेकर

बाबू कवळेकर यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे: सुभाष फळदेसाई

दैनिक गोमन्तक

मडगाव: ‘कोण काय बोलतात ते बोलू द्या, पण मी भाजपाशीच प्रामाणिक आहे. माझ्या नशिबात काय आहे ते मला मिळणार, त्यासाठी मी कधी लॉबिंग केलेले नाही’, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली.

बाबू कवळेकर यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि त्या लालसेपोटीच त्यांनी आपली पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगेत अपक्ष म्हणून उभे केले, असा आरोप भाजपचे सांगेचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांनी काल केला होता. या आरोपामुळे भाजप वर्तुळात खळबळ माजली असून त्या पार्श्वभूमीवर कवळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली बाजू मांडली.

कवळेकर म्हणाले, मी कधीही अती महत्वाकांक्षी नव्हतो. आजही नाही. मी कधीही कोणत्या पदाची मागणी केलेली नाही. मला ती पदे देवाच्या कृपेने आपोआप मिळाली आहेत. यापुढेही तसेच होणार याची मला खात्री आहे.

मी काँग्रेसमध्ये असताना त्या पक्षाशी प्रामाणिक होतो. आता मी भाजपात आहे. मी भाजपशी प्रामाणिक आहे. त्यामुळे कोण काय बोलतात त्यावर मला प्रतिक्रिया द्यावी, असे वाटत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT