Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: अरविंद केजरीवाल उद्या गोवा दौऱ्यावर

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गुरुवारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गुरुवारी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. गोव्यातील तळागाळातील मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी केजरीवाल राज्यातील विविध मतदारसंघांना भेटी देणार आहेत. (Arvind Kejriwal To Visit Goa Tomorrow)

दरम्यान, दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री गुरुवारी दुपारी गोव्यात येणार आहेत. येत्या दोन दिवसांत ते विविध सभांना संबोधित करणार आहेत. राज्यातील शिरोडा, पर्ये , मये, सांताक्रुझ, वेळी, बाणावली , कुठ्ठाळी आणि नावेली या आठ मतदारसंघात सभा होणार आहेत, यात ते राज्यासाठी आपचे व्हिजन स्पष्ट करणार गेल्या भेटीत केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गोव्याच्या अनुसूचित जमातींच्या (एसटी) हितासाठी त्यांच्या पक्षाचा आठ सूत्री अजेंडा जाहीर केला.

तसेच, आदिवासी उपयोजनेंतर्गत एसटी समाजासाठी दिलेली रक्कम त्यांच्या कल्याणासाठी खर्च करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सरकारी कार्यालयांमधील एसटी समुदायासाठी 3,000 रिक्त पदे भरली जातील, बाकीच्यांसाठी खाजगी नोकऱ्यांची व्यवस्था करेल आणि नोकऱ्या मिळेपर्यंत 3,000 रुपये बेरोजगार भत्ता देईल याची आप सरकार खात्री करेल.

शिवाय, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींच्या जमिनीची मालकी निश्चित केली जाईल, आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) सरकार विधानमंडळातील 12.5% ​​आरक्षण पूर्ण करेल, ज्याकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केले होते. एसटी समाजातील लोकांना मोफत आरोग्य सेवा आणि शिक्षण दिले जाईल - चांगल्या शाळा आणि रुग्णालये बांधली जातील. 18 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक महिलेला मासिक आधारावर 1,000 रुपये मिळतील. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यावर कार्यसूचीतील हे आठही मुद्दे लागू केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT