पणजी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना दिल्लीला (Delhi) बोलावून घेतले. उत्पल यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक (Goa Assembly Election) लढवू नये, यासाठी शहा यांनी त्यांच्यावर दबाव आणला. उत्पल पर्रीकर गेले महिनाभर पणजीत (Panaji) निवडणूक प्रचार चालवत असून अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढविणार, असे त्यांनी जाहीर केले आहे. सोमवारी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांना शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्याचे आवाहन केले होते. (Utpal Parrikar meets Amit shah for Goa Election 2022)
अमित शहा यांनी गेल्या दोन महिन्यांत उत्पल पर्रीकर यांच्याशी दोनवेळा सविस्तर चर्चा केली आहे. शहा यांनी त्यांना भाजपतर्फे (BJP) केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दाखवला. बाबूश मोन्सेरात यांचे पणजीतील स्थान अबाधित असल्याचे उत्पल यांना सांगण्यात आले. बाबूश मोन्सेरात यांचा तिसवाडी तालुक्यावर प्रभाव आहे आणि त्यांना उमेदवारी डावलल्यास पक्षाच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. शिवाय 2022 ची निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे, असे शहा यांनी उत्पल यांना सुनावले. उत्पल यांच्या निकटच्या सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांना उत्पलनी आपला अनुभव कथन केला.
देशभर वाईट संदेश
उत्पल म्हणाले, माझ्या वडिलांनी गोव्यात भाजपा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. मी कोणत्याही परिस्थितीत पणजीची निवडणूक लढविणार, असे उत्पल यांनी शहा यांना निक्षून सांगितले. पण माजी मुख्यमंत्री स्व. पर्रीकर यांचे पुत्र निवडणुकीत पराभूत झाले, तर तो एक वाईट संदेश देशभर जाईल, असे शहा यांनी उत्पल यांना सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.