Goa Election 2022: पर्रिकर पुत्र उत्पल यांना शिवसेनेचं तिकीट?

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये गोवा निवडणुकीवर जास्तीत जास्त भर दिला. विशेष म्हणजे राऊतांनी गोव्याचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर (Late Manohar Parrikar) यांच्या पुत्रावर भाष्य केलं.
Utpal Parrikar and Sanjay Raut on  Goa assembly election
Utpal Parrikar and Sanjay Raut on Goa assembly electionDainik Gomantak

गोव्यासाठी विधानसभा निवडणुकांची (Goa Assembly Elections 2020) घोषणा झाली आहे आणि राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात फासे टाकताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये गोवा निवडणुकूवर जास्तीत जास्त भर दिला. विशेष म्हणजे राऊतांनी गोव्याचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांच्या पुत्रावर भाष्य केलं. सध्या गोव्यात भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सत्तेवर आहेत. पण गोव्यात भाजपची कोणती पुण्याई असेल तर ती फक्त मनोहर पर्रिकरांनी केलेल्या कामाची. त्याच शिदोरीवर अजूनही भाजपा गोव्यात पर्रिकरांच्या जोरावर निवडणुकांचे ढोल वाजवत आहेत. (Goa Assembly Elections 2022: Will Utpal Parrikar join Shivsen )

Utpal Parrikar and Sanjay Raut on  Goa assembly election
पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांच्या चेहऱ्याशिवाय भाजप मैदानात, काय आहे तयारी?

दरम्यान पर्रिकर पुत्र उत्पल (Utpal Parrikar) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Election) भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा गोव्यात भाजपला दिला होता. मात्र, या जागेवरून भाजपा (BJP) आपल्याला नक्कीच तिकीट देईल, असा विश्वासही त्यांनी काही दिवसांपुर्वी व्यक्त केला होता. मात्र आता पर्रिकरांच्या मुलालाच गळाला लावून भाजपची अडचण करण्याचा प्रयत्न शिवसेना करताना दिसत आहे. कारण प्रश्न आहे उत्पल पर्रिकरांचा. त्यांना भाजप तिकीट देणार का? नाही तर शिवसेना (Shivsena) त्यांना तिकीट देणार का? अशा प्रश्नांवर संजय राऊतांनी (Sanjay Raut) सविस्तर स्पष्टीकरण दिलं.

उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवली तर...

“दादरा नगर हवेलीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणुक जिंकलो आहोत. जर पर्रिकरांच्या कुटुंबाने हिंदुत्त्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावेल. त्यासाठी उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भाजपा रुजवण्याचा प्रयत्न केला. मनोहर पर्रिकरांच्या प्रतिमेमुळे भाजपा गोव्यात अजूनही पाय रोवून आहे. राजकारणामध्ये धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जमिनीवर चार हात चालत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कधी काळी लोक विचारत होते गोव्यात भाजपाला काय महत्त्व आहे. पण येणार काळ ठरवेल हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना राहते की भाजपा,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी काल केले.

Utpal Parrikar and Sanjay Raut on  Goa assembly election
अखेर महाविकास आघाडीत बिघाडी; संजय राऊत

भाजपची डोकेदुखी वाढणार

दरम्यान गोव्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय खलबते सुरू झाली आहेत. राज्यात 14 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सर्वच पक्षांनी फासे टाकण्याचा आणि पक्षांतरांचा जोर धरला आहे. गोव्यातील जागांच्या संदर्भात निषेधाचे आवाजही वेगाने उठू लागले आहेत. गोव्यात सध्या ज्या जागेवरून राजकारण तापत आहे ती म्हणजे पर्रिकरांचा बालेकिल्ला असलेला पणजी मतदारसंघ. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी मतदारसंघावर सातत्याने दावा करत आहेत. तर बाबुश मोन्सेरात या जागेवरील आपला दावा सोडायला तयार नाहीत. बाबूश यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पणजीतून प्रचाराला सुरुवात

उत्पल पर्रीकर यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या वाढदिनी पणजीतून प्रचाराला सुरुवात केली होती. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आपल्या उमेदवारीचा विचार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांनी घरोघरी जाऊन प्रचारही सुरू केला आहे. याशिवाय ते बूथ स्तरावरील बैठकाही घेत आहेत. गेल्या आठवड्यात बाबूश मोन्सेरात यांनी भाजपसोबत राहण्यासाठी गोव्यात असल्याचे सांगताच, उत्पल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याचा आपला इरादाही स्पष्ट केला.

पोटनिवडणुकीत भाजपने उत्पल यांना तिकीट नाकारले

या मुद्द्यावर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. 'मी नड्डा यांना भाजपचे मुख्य कार्यकर्ते आणि मतदार माझ्यासोबत असल्याचे सांगितले आहे. पणजीपेक्षा मला चांगला पाठिंबा मिळत आहे. या संदर्भात नड्डा यांनी आपल्याला कोणताही सल्ला दिला नाही. मला पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवायची होती. पण भाजपने कुटुंबवादाला चालना न देण्याच्या नावाखाली उत्पल पर्रीकर यांना तिकीट देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे उत्पल यांनी सांगितले.

Utpal Parrikar and Sanjay Raut on  Goa assembly election
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी TMC आणि Congress एकत्र येणार का?

पणजी मतदारसंघातून दोन्ही नेते दावा करत आहेत

जोपर्यंत मनोहर पर्रीकर हयात होते तोपर्यंत उत्पल यांनी राजकारणात रस दाखवला नाही. मात्र, आता ते वडिलांच्या राजकीय वारशावर आपला दावा सातत्याने मांडत आहेत. हे दोघेही पणजी मतदारसंघातून आपला दावा करत आहेत. या जागेसाठी भाजपला आता उत्पल आणि विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यापैकी एकाची निवड करायची आहे. आणि हे भाजपसाठी डोकेदुखी वाढणार आहे. मात्र आत राउतांच्या प्रस्तावावर पर्रिकरपुत्र काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com