Amit Shah Dainik gomantak
गोवा निवडणूक

दिगंबर कामत म्हणजे अव्यवस्था, अस्थिरता आणि अराजकता: अमित शहा

यावेळी फोंडा येथे बोलतांना शहा यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली.

दैनिक गोमन्तक

भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे आज रविवारी दाबोळी विमानतळावर दुपारी आगमन झाले. प्रचारासाठी ते राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दाबोळी विमानतळावर आगमन होताच त्यांचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत (Pramod Sawant), केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. (Amit Shah in Goa)

यावेळी फोंडा (Ponda) येथे बोलतांना शहा यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. "जेव्हापासून गोव्यात भाजपचे सरकार (BJP Government) आले तेव्हापासून गोव्याच्या विकास झाला. जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत होते आणि दिगंबर कामत म्हणजे अव्यवस्था, अस्थिरता आणि अराजकता. कॉंग्रेस पक्षाला उठता बसता मोदी दिसतात. म्हणून विरोधी पक्ष वारंवार मोदी सरकारवर टिका करत असतात," असे म्हणत शहा यांनी कॉंग्रसे पक्षांवर सडकून टिका केली.

यावेळी गोल्डन गोवा हवा असेल तर भाजपला पाठिंबा द्या असे आवाहन अमित शहा यांनी गोवेकरांना केले. "गोवा देशाच्या नकाशावर जरी लहान दिसत असला तरी गोवा राज्याचे खूप मोठे महत्व आहे. देशाच्या नकाशावर गोवा एका सुरेख बिंदीसारखा दिसायला हवा यासाठी गोव्याचे युवा नेता प्रमोद सावंत प्रयत्न करत आहे. भाजप सरकार गोव्यात विकास घडवून आणत आहे. गोव्यातील निवडणूक प्रचारादरम्यान राज्याच्या चांगल्या विकासासाठी 'डबल इंजिन सरकार' आवश्यक आहे," असे शहा यांनी फोंडा येथे बोलत असतांना सांगितले.

"गोल्डन गोव्याचे स्वप्न मनोहर पर्रिकर यांन पाहिले होते. आणि आता तेच स्वप्न प्रमोद सावंत साकार करणार आहे. सावंत सरकारने गोव्यात आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवत 100 टक्के लसिकरण करणारे राज्य म्हणून गोव्याचे नाव मोठे केले. आणि पुढेही ते गोवेकरांच्या विकासासाठी झटत राहणार आहे. भाजप गोव्याच्या विकासासाठी, युवकांसाठी, आदिवासींसाठी आणि बेरोजगार युवकांसाठी विकास घडवून आणणार आहे. भाजप एक जबाबदार आणि विश्वासहार्य पक्ष आहे, म्हणूनच मोदीजींनी देशाला सहा वर्षात पुढे नेले, भारताला सुरक्षा देण्याच काम मोदीजींनी केल आहे, असे म्हणत सावंत यांचा प्रचार करायला शहा विसरले नाही.

'गोव्यातील निवडणूक प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. आणि गोव्याचास, गोवेकरांचा विकास करणे हेत भाजप सरकारचे ध्येय आहे असे म्हणत, '22 इन 22' म्हणजेच 2022 (Mission 22 in 2022)मध्ये 22 आमदारांचा विजय गोव्यात होणार," अशी घोषणा अमित शहा यांनी आज फोंड्यात केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT