Allegation of money distribution on Alemao Sisters over Goa Election Dainik Gomantak
गोवा निवडणूक

आलेमाव भगिनींवर पैसे वाटपाचा आरोप, नावेलीत तणाव

प्रतिमा कुतिन्हो आणि दिग्विजित चव्हाण हे उमेदवार आक्रमक, पोलीस घटनास्थळी दाखल

आदित्य जोशी

मडगाव : तृणमूल काँग्रेसच्या नावेलीच्या उमेदवार वालंका आलेमाव यांच्या बहिणींवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आहे. वालांका यांच्या दोन बहिणी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे वाटत असल्याचा आरोप झाल्यानंतर नावेलीत तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Goa Election News Updates)

नावेलीत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उमेदवार वालांका आलेमाव यांच्या बहिणींनी पैसे वाटल्याचा आरोप प्रतिमा कुतिन्हो आणि दिग्विजित चव्हाण या उमेदवारांनी केला आहे. इतकंच नाही तर या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यांना घेरावही घालता आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. आलेमाव बहिणींना बाहेर काढण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान गोव्यात विधानसभेसाठी (Goa Assembly Elections) सकाळपासून शांततेत मतदान सुरु आहे. काही अपवाद वगळता कुठेही मतदानाला गालबोट लागलेलं नाही. ताळगावमध्ये इव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान संथगतीने सुरु होतं. त्यामुळे मतदारांनी (Voters) गोंधळ घातल्याची माहिती आहे. ताळगावात सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी पाहायला मिळाली, त्यात मशीनमधील बिघाडामुळे लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT