गोव्यात परिवर्तनासाठी मतदारांचा कौल, भाजपविरोधी जनमत : दीपक ढवळीकर

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आपल्यात असल्याचा दीपक ढवळीकरांचा दावा
Deepak Dhavalikar
Deepak DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आपण प्रियोळ मतदारसंघात 70 टक्के मतं मिळवणार असून गोमंतकीय जनतेला परिवर्तन हवं आहे, अशी प्रतिक्रिया मगोप नेते दीपक ढवळीकर यांनी दिली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. लोकांनी माझं काम पाहिलं आहे त्यामुळे ते आपल्याला निवडून देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Deepak Dhavalikar News Updates)

Deepak Dhavalikar
वडिलांच्या मार्गावर चाललो आहे, उत्पल पर्रीकरांची भावनिक साद

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आपल्यात आहे. हे जनतेला माहित आहे त्यामुळे ते आपल्याला मतदान करतील, असा दावाही दीपक ढवळीकर यांनी केला आहे. आज गोव्यात लोकं मतदान करत आहेत ते परिवर्तनासाठी आहे. कारण गोव्यात (Goa) परिवर्तनाची गरज आहे. लोक सरकारला त्याची जागा दाखवायला घराबाहेर पडले आहेत, असा निशाणाही त्यांनी साधला.

Deepak Dhavalikar
संथगतीने मतदानामुळे ताळगावात मतदार आक्रमक

दरम्यान गोव्यात सत्तेत येणारं सरकार हे भाजपविरोधी (BJP) सरकारच असेल. आणि जो भ्रष्टाचार या सरकारने गेल्या 5 वर्षात केला आहे, त्याचा अनुभव लोकांनी घेतला आहे. त्यामुळे बदल घडवण्यासाठी गोमंतकीय जनता (Voter) घराबाहेर पडून मतदान करत आहे, असंही दीपक ढवळीकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com