एलिना साल्ढाणा यांचा आपमध्ये प्रवेश, प्रवीण झांट्ये मगोच्या वाटेवर

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

एलिना साल्ढाणा यांचा आपमध्ये प्रवेश, प्रवीण झांट्ये मगोच्या वाटेवर

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणूक (Goa Election) आणि गोवा मुक्तीचा हीरकमहोत्सवी (60th goa liberation day) सोहळा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 19 डिसेंबरला गोव्यात दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात भाजपमध्ये (BJP) अनेक घडामोडी घडत आहेत. भाजप संघटन अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच  भाजपच्या आमदार एलिना साल्‍ढाणा (Alina saldhana) यांनी पक्षाचा राजीनामा देऊन आम आदमी पक्षात (AAP) अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे, तर प्रवीण झांट्ये मगोपमध्ये दाखल होण्याच्या वाटेवर आहेत. आमदार अलिना साल्डाना यांचा ‘आप’मध्ये प्रवेश!

हा दणका असतानाच मंत्री वासनाकांड प्रकरण, नोकरभरती घोटाळा, ‘सोपटे टॅक्स’, नोकरभरती घोटाळा अशा विविध प्रकारच्या समस्यांच्या गर्तेत भाजप सापडला आहे. यातच आता पक्षात नाराजीचा सूर वाढत आहे. भाजपचे कार्लुस आल्मेदा, महानंद अस्नोडकर, दिलीप परुळेकर, बाबू आजगावकर, दीपक पावसकर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे येत्या काही दिवसात वेगळा निर्णय घेऊ शकतात.

आता 44 लाख खंडणी प्रकरण

‘सेक्‍स स्‍कँडल’ प्रकरणी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचा हुरूप वाढला आहे. या पक्षाने आता ‘सोपटे टॅक्स’ प्रकरणाकडे आपले लक्ष वळवले आहे. आमदार सोपटे यांनी दिल्लीच्या उद्योजकाकडे मागितलेल्या 44 लाखांच्या खंडणीचे प्रकरण काँग्रेस पक्ष लावून धरणार आहे. दुसरीकडे स्वकीयच करीत असलेल्‍या आरोपांमुळे भाजपचे मनोबल तुटत चालले आहे. नोकरभरती घोटाळा प्रकरणी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केलेल्‍या आरोपांमुळे विरोधकांच्‍या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. त्यामुळे ते आक्रमक होत भाजपविरोधात रान पेटवत आहेत. दरम्यान, काँग्रेसने एकूण 10 उमेदवारांची नावे निश्‍चित केली होती, परंतु अखेरच्या क्षणी पर्ये आणि पेडणेतील उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत.

विधानसभेची सदस्य संख्या 40 वरून 35 वर!

भाजपच्‍या एकमेव महिला आमदार एलिना साल्ढाणा यांनी आज सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे आपल्‍या आमदारकीचा राजीनामा दिला. या विधानसभेतील त्या पाचव्या आमदार आहेत. ज्यांनी विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी राजीनामा दिला आहे. यापूर्वी लुईझिन फालेरो, रवी नाईक, चर्चिल आलेमाव आणि जयेश साळगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे 40 सदस्य असणाऱ्या विधानसभेची सदस्य संख्या 35 वर आली आहे.

भाजप समस्यांच्या गर्तेत

मंत्रिपदाचा कालच राजीनामा दिलेले मिलिंद नाईक यांचे सेक्स स्कँडल प्रकरण सध्‍या सर्वत्र गाजत आहे. हे प्रकरण त्‍यांच्याबरोबर भाजपलाही भोवणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे नोकरभरतीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. ‘आप’ व काँग्रेस पक्षाने दक्षता विभागाकडे तक्रार नोंदवली असून न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. शिवाय इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले जयेश साळगावकर, दाजी साळकर, रोहन खंवटे (उद्या प्रवेश करणार) यांच्याविरोधात स्थानिक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. एकंदरीत भाजप अनेक समस्‍यांच्‍या गर्तेत सापडत चालला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT