Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: मतदानयंत्रे हॅक होण्याची आलेमाव यांना भीती

सर्व मतदान यंत्रांमधील स्लिप्सची मोजणी करा; आलेमाव यांची मागणी

दैनिक गोमन्तक

मडगाव: 2012 च्या निवडणुकीत आलेमाव कुटुंबातील चारही उमेदवार मतदान यंत्रात केलेल्या मतांच्या फेरफारामुळे पराजित झाले असा कांगावा करणारे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांना पुन्हा एकदा या निवडणुकीत असाच प्रकार होणार अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे केवळ 3 व्हीव्हीपॅट मशीन मधील स्लिप्सची मोजणी न करता सर्व मशीनमधील स्लिप्सची मोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Goa Politics News)

बुधवारी वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भीती व्यक्त केली. ते म्हणाले, मागच्या चार दिवसात असा फेरफार करण्याची तयारी चालू आहे अशी माहिती कानावर पडते. गोव्यात सेक्युलर सरकार सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी हे कारस्थान केले जात आहे अशी शंका येते. त्यासाठी लवकरच आपण निवडणूक आयोगाला (Election Commission) पत्र लिहून व्हीव्हीपॅटच्या सर्व स्लिप्सची मोजणी करावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

2012 च्या निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये असाच फेरफार करून आमच्या कुटुंबातील चारही उमेदवारांना पाडण्यात आले होते. त्यावेळी मी हे सांगत होतो, पण लोक मला हसत होते. मात्र या यंत्रामध्ये फेरफार केला जाऊ शकतो, हे नंतर कित्येक तज्ज्ञांनी स्पष्ट केले असे ते म्हणाले. गोव्यात (Goa) सेक्युलर सरकार येणार असून त्यात तृणमुलच्या आमदारांचा सहभाग असेल, असे मतही चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT