Goa Elections: नुवे मतदारसंघात काँग्रेसच्या (Congress) उमेदवारीवर दावा करणारे राजू काब्राल यांच्यासह सुमारे 200 कार्यकर्त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. यावेळी तृणमूलच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
काँग्रेस महिला मोर्चाच्या माजी अध्यक्ष कोरोन फर्नांडिस, काँग्रेस अकुशल कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस्को कार्लोस, काँग्रेसचे माजी युवा अध्यक्ष हेडन फर्नांडिस आणि ग्रेगोरियो एस फर्नांडिस यांचा पक्षात प्रवेश झालेल्या प्रमुखांमध्ये समावेश आहे. तृणमूलच्या लोकसभा खासदार आणि गोवा प्रभारी महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी काब्राल म्हणाले, “आम्ही गोव्याचे भविष्य ठरवण्यासाठी येथे जमलो आहोत. गोवा मुक्तीदिन (Goa Liberation Day) असूनही मला मुक्त झाल्याचे वाटत नाही. ममता दीदींच्या नेतृत्वाखालीच भाजपच्या (BJP) कुशासनातून मुक्तता होऊ शकते. फर्नांडिस म्हणाले, मी काँग्रेसचा राजीनामा दिला, कारण ते नेहमीचे विश्वासघात करणारे आहेत. आता मी ''टीएमसी''मध्ये (TMC) सामील झालो आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.