Sao Joao traditions Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Sao Joao Goa: पिढ्यांना एकत्र जोडणारी 'विहीर' आणि सांजावची जपलेली परंपरी

Sao Joao Well Connection: सांजाव साजरा करणारे या विहिरीला पवित्र मानतात. ही विहीर कडक उन्हाळ्यात देखील कधीच सुकत नाही आणि दरवर्षी ती पूर्णपणे साफ केली जाते.

Sameer Panditrao

किंबर्ली कुलासो 

फक्त गोव्यातच तर सबंध देशात आकर्षणाचा विषय ठरलेला ‘सांजाव’ चार दिवसांपूर्वीच गोव्यात धुमधडाक्याने पार पडला. या सणाने आता व्यावसायिक रूप स्वीकारल्यामुळे त्याच्या पारंपरिक गोडव्याची कल्पना फार कमी लोकांना आहे.

पण गोव्यात अशी काही गावे आहेत जिथे विहिरीतील उड्या, घरगुती खाद्यपदार्थ, इत्यादी परंपरा राखून सांजाव साजरा होतो. राय गावातील एका शांत कोपऱ्यात साजरा होणारा सांजाव त्यापैकीच एक आहे. सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या सन्मानार्थ आयोजित होणारा हा उत्सव गोव्यात ‘जावयांचा उत्सव’ (thefeast of sons-in-law) म्हणूनही ओळखला जातो.

नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या माहेरच्या लोकांकडून या उत्सवाच्या निमित्ताने भेटवस्तू-पाठवण्यात येते. सांजावमधील या साऱ्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा हळूहळू लोप पावत असताना, राय गावातील एक वाड्यावरील विहीरीजवळ, तेथील मर्यादित संख्येने असलेल्या घरातील  लोक एकत्र जमतात आणि पारंपारिक पद्धतीने सांजाव साजरा करतात. ही परंपरा पुढील पिढींपर्यंत चालूच राहावी अशी आशाही ते बाळगतात.

विहीर सजवलेली असतेच पण त्याचबरोबर मुलींना विहिरीत उतरता यावे यासाठी तिथे एक शिडी देखील सज्ज असते. या गावात वीस वर्षांपूर्वी लग्न करून आलेली रोजीटा कुलासो सांगते, मीकधीच या विहिरीत उडी मारलेली नाही मात्र आमच्या मुलींना त्यात उतरण्यासाठी आमचा अजिबात प्रतिबंध नसतो. मुलांबरोबर त्यांनाही विहिरीत उडी मारायची असते मात्र त्यांना विहिरीत उतरणे सोपे जावे म्हणून शिडीची व्यवस्था केली आहे. यंदाचा त्यांचा सांजाव तर खास होता- तेथील एका कुटुंबातील मुलाचे, मार्कुस कॉस्ताचे नोव्हेंबरमध्ये लग्न झाले होते आणि तो अधिकच उत्साहात होता.

तो सांगत होता, ‘माझ्या’सासूबाईंनी आमच्यासाठी खूप पारंपरिक मिठाई आणि फळे पाठवली आहेत. एका कोकणी गीतात म्हटले आहे त्याप्रमाणे खरोखरच हा सण एकाच वर्षात दोनदा का येत नाही? हा खरोखर एक मजेदार आणि आनंदाचा उत्सव आहे. ‘मार्कुस’ बोलत असताना त्याची पत्नी नासीदा टी-शर्ट आणि शॉर्ट घालून जवळच लाजत उभी होती. जांभळ्या आणि पिवळ्या फुलांपासून बनवलेले कोपेल तिच्या माथ्यावर छान शोभत होते. ती म्हणाली, माझ्या आई-वडिलांनी मला पाठवलेले वोजे आम्ही सर्व नातेवाईक आणि मित्रांमध्ये वाटून टाकले.

त्यांनी आपल्या जावयासाठी दारूच्या बाटल्याही पाठवल्या होत्या. अर्थात ही परंपरा आहे.वडीलधाऱ्यांच्या सावध नजरेखाली अनेकजण विहिरीत उड्या मारत होते.‌ जोकिम सांगायला लागला, या विहिरीत उडी मारायची आम्हाला सवय आहे. आम्हाला पोहता येते त्याशिवाय विहिरीत असलेल्या व्यक्तीवर इतरांची उडी पडू नये म्हणूनही आम्ही खबरदारी घेतो.‌ आमच्या बायका आणि बहिणीही आमच्यावर लक्ष ठेवून असतात. संख्येने हा गट लहान असल्याने तिथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ नव्हता. उडी मारण्यास घाबरत असलेल्यांसाठी तिथे दोरीचीही व्यवस्था केली गेली होती.

सांजाव साजरा करणारे या विहिरीला पवित्र मानतात. ही विहीर कडक उन्हाळ्यात देखील कधीच सुकत नाही आणि दरवर्षी ती पूर्णपणे साफ केली जाते. त्यांच्यासाठी ही विहीर केवळ पाण्याने भरलेली जागा नसून ती एक परंपरेचे प्रतीक आहे जी सांजावच्या निमित्ताने विभिन्न पिढ्यांना एकत्र जोडते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT