Sao Joao: सांजाव घुंवता! चुडताचा पीडा, विहिरीतील उड्या; गोमंतकीयांचा ऊर्जादायी महोत्सव

Sao Joao Festival: सांंजाव म्हटले की अंगात एक प्रकारची ऊर्जा अंगात आपोआपच संचारते. मी लहानपणापासून सांजावचा आनंद अनुभवत आलो आहे. त्यावेळी सांजावाचे रूप खूपच पारंपारिक होते.
Sao Joao Festival 2025
Sao Joao Festival GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सांंजाव म्हटले की अंगात एक प्रकारची ऊर्जा अंगात आपोआपच संचारते. मी लहानपणापासून सांजावचा आनंद अनुभवत आलो आहे.  त्यावेळी सांजावाचे रूप खूपच पारंपारिक होते. हातात चुडताचा पीडा घेऊन मुले एकत्रितपणे पाण्याने भरलेल्या विहिरीत उड्या मारायला जायची, घरातील नवविवाहित दांपत्ये त्यांना मिष्टान्न खायला द्यायची. त्या सगळ्या आठवणी आठवल्यानंतर सांजावचे एक लोभस रूप डोळ्यांसमोर तयार होते.‌ 

'सांजाव घुंवता' ही आरोळी आपल्याला आज अनेक ठिकाणी ऐकू येईल. 'घुंवता' म्हणजे चक्रावून जाणे. खरे तर सांजाव घुंवत नाही तर सांजावाची अतिरिक्त मौज घेऊन माणूसच घुंवत असतो पण आपण आपली ती शारीरिक क्रिया या उत्सवाशी जोडून तो स्वतःच उत्सवरूपच व्हायला पाहतो. सांजाव पातोळ्या मागत नाही तर माणूसच सांजावरूप बनून  त्या मागतो. 

सांजाव उत्सवात एखाद्याच्या अंगणात पोहोचले की अनेकजण आपोआप शीघ्रकवी बनतात. ज्याचे ते अंगण असेल त्या यजमानाचे नाव गाण्याच्या ओळीत गुंफून गाणी म्हटली जातात. अशाप्रकारे सांजाव उत्सव क्रिएटिव्हिटीचा एक मंचही बनून जातो. अर्थात आता सांजाव उत्सवाला इतर अनेक उत्सवांसारखेच व्यावसायिक रूप येत चालल्यामुळे या उत्सवातला पूर्वीचा निरागस आनंद हरवला जात आहे हे मात्र खरे. 

खरे तर हा उत्सव सेंट जॉन द बाप्तिस्त यांच्या स्मृतींशी संबंधित आहे. त्याला एक धार्मिक अंगही आहे मात्र या उत्सवाच्या मौजमजेच्या अंगालाच आज अधिक प्राधान्य मिळताना दिसते. या सणाची जी धार्मिक बाजू आहे ती कुणाला बदलता येणार नाही मात्र या सणाच्या निमित्ताने जी मौज अनुभवली जाते त्या मौजेला मात्र वेगवेगळे स्वरूप, वेगवेगळ्या ठिकाणी मिळाले आहे. 

Sao Joao Festival 2025
Sao Joao: भव्य बोट परेड, रंगीबेरंगी फ्लोट्स, ढोल-ताशांचा गजर! शिवोलीत होणार ‘सांजाव’चा जल्लोष

कॅथलिक समुदायाच्या इतर सणांपेक्षा सांजाव हा निश्चितच वेगळा सण आहे. इतर सणांमध्ये विहिरीत मस्तपैकी उड्या मारायची, डोक्यावर फुलांचे मुकुट परिधान करण्याची किंवा भिजण्याचा आनंद घ्यायची संधी कधीच मिळणार नाही. सांजावच्या निमित्ताने घरात शिजणाऱ्या अनोख्या पाककृती हे देखील सांजाव आवडण्याचे एक कारण आहेच. 

Sao Joao Festival 2025
Sao Joao Festival 2025: 'सांजाव' साठी गोव्यात जायचंय, पण नेमकं कुठे जावं आणि काय बघावं असा प्रश्न पडलाय? एका 'क्लिकवर उत्तर' जाणून घ्या

मौजमौजेचा सण असलेल्या अशा या सांजावची परंपरा आपण सांभाळायलाच हवी. धर्माची मर्यादा ओलांडून साऱ्या समुदायाला एकत्र आणणारे असे उत्सव चालूच रहायला हवेत. अर्थात त्यातील मौजमजेने आपली हद्द मात्र ओलांडता कामा नये.  

ओलाव फर्नांडिस (गायक/संगीतकार)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com