Serendipity Arts Festival Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Serendipity Arts Festival 2025: मिरामार समुद्रकिनारा अशा रचनेसाठी एक चांगली जागा असू शकते हे तिने सुचवले आणि त्यानुसार आम्हाला जागाही दाखवली.

गोमंतक ऑनलाईन टीम

लोकांना सावली मिळावी हा सर्वात पहिला उद्देश या रचनेची संकल्पना करण्यामागे होता. स्मृती राजगिरा यांना गेल्या वर्षी यासंबंधीचा प्रस्ताव मी सादर केला. गोव्यातील बहुतेक सार्वजनिक आणि मोकळ्या  जागांवर, लोकांना सावली मिळावी अशी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही अशा रचनेचा विचार करत होतो जी सावली देईल, पावसात देखील तग धरू शकेल आणि पावसाच्या पाण्याचा निचराही व्यवस्थित करू शकेल. माझ्या संकल्पनेला स्मृतीकडून पाठबळ तर मिळालेच पण त्याशिवाय तिने ह्या रचनेचे स्वरूप अधिक व्यापक रूपात पाहिले. मिरामार समुद्रकिनारा अशा रचनेसाठी एक चांगली जागा असू शकते हे तिने सुचवले आणि त्यानुसार आम्हाला जागाही दाखवली. 

ही रचना जणू एक वळसा घेणारे एक रिबन आहे. रिबन ही संकल्पना घेऊनच आम्ही या रचनेचा विचार करत गेलो. या रचनेत लोकांना बसण्याची सोय आहे त्याबरोबरच वळसा घेऊन ही रचना एक सुंदर कमानही बनते. ही संपूर्ण रचना, सभोवताली असलेल्या झाडांमुळे प्रेरित झाली आहे. झाडांना वळसा घालत ही रचना जाते. ही रचना भक्कम आहे त्यामुळे कोणीही तिच्यावर चढू शकतो, मुले खेळू शकतात. त्याशिवाय इथे छोट्या कार्यक्रमांची सादरीकरणे देखील होऊ शकतात. नेपथ्य म्हणूनही ही रचना वापरली जाऊ शकते.

सुमारे 20000 मातीच्या (टेराकोटा) पेल्यांचा (कुल्हड) वापर करून बनवली गेलेली ‘टेरा-ग्रुव्ह’ या भव्य आणि आकर्षक रचनेचे झालेले अनावरण ही येत्या 12 ते 21 डिसेंबर दरम्यान पणजी शहरात आयोजित होणाऱ्या 10व्या सेरेंडिपीटी कला महोत्सवाची एक प्रकारची पायाभरणी होती. मिरामार समुद्रकिनाऱ्यावरील  सुरूंच्या गच्च बनात ही रचना उभारण्यात आली आहे. मिरामार समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी विश्रांतीचे हे नवे सुंदर ठिकाण असेल. ही रचना करण्यासाठी रचनाकार विनू डॅनियल यांच्या टीमला सुमारे तीन महिने लागले. 

10व्या वर्षात प्रवेश करताना सेरेंडिपीटीने देशविदेशात आपला प्रवास सुरू केला. बर्मिंघम येथे काव्यवाचन व कार्यक्रम, अहमदाबादमध्ये इंडिया आर्ट फेअरसोबत सहयोग, दिल्लीतील सफदरजंग टॉम्बसमोरची ‘शाम-ए-गझल, वाराणसीत ब्रिजरामा पॅलेसमधील ‘ रिव्हरराग’, चेन्नईत कला व सामाजिक उपक्रमांवरील विशेष सायंकाळ, गुरुग्राममधील ‘बी साइड सेशन्स’ आणि दुबईतील आधुनिक कला वातावरणाने या प्रवासात नवचैतन्य भरले आहे. या सर्व शहरांमधून प्रवास करत हा सर्वात मोठा उत्सव पुन्हा गोव्यात येत आहे.

गोव्यातील (Goa) पोर्तुगालचे कौन्सिल जनरल डॉ् पेड्रो फोंसेका काब्राल अदाओ (२००५-०६). यांचा गोव्यातील मुक्काम अल्पकाळ असला तरी त्यांनी अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले होते.‌ त्याशिवाय गोव्यातील वाणिज्य दूतावासात कला आणि संस्कृती क्षेत्र स्थापन करण्यामागे देखील त्यांचा हात होता.’ गोव्यातील कलाकारांच्या नजरेतून पोर्तुगाल’ या विषयावर एक प्रदर्शन आयोजित करण्याची कल्पना त्यांनी त्याकाळात गोव्यातील कलाकारांसमोर मांडून साकार केली होती. 

त्यांच्या निधनानंतर कळंगुट येथील ‘आर्ट चेंबर गॅलरीया डी बॅलास आर्ट्स' त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आले आहे. तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांनी केलेले काम सुरू ठेवण्यासाठी ‘दि लेटेस्ट डॉ. पेड्रो काब्राल अदाओ पुरस्कार’ही देण्यात येतो. 2025 मध्ये ‘पोर्तुगाल थ्रू द आइज ऑफ आर्टिस्ट इन गोवा’ या प्रदर्शनाला 20 वर्षे पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने 'पेंटिंग्स अँड मोअर' हे प्रदर्शन, एका वाणिज्य दूतावासाचे रूपांतर वैभवी आर्ट गॅलरीमध्ये करणाऱ्या डॉ् पेड्रो यांना श्रद्धांजली म्हणून आयोजित होत आहे. 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आर्ट चेंबर गॅलरीया डी बॅलास आर्ट्स' गॅलरीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: अर्शदीप सिंहनं टाकलं 13 चेंडूंचं षटक! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावावर केला लाजिरवाणा रेकॉर्ड

Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

Goya Club Seal: परवानग्यांमध्ये घोळ, सुरक्षा नियमांची ऐशीतैशी, वागातोरमधील प्रसिद्ध 'गोया' क्लब सील; गोव्यातील नाईटलाइफला कडक संदेश

Crime News: एकाला फाशी, 9 जणांना जन्मठेप... हिंसाचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना कोर्टाचा दणका; काय आहे नेमकं प्रकरण?

VIDEO: भारतीय सागरी सीमेत घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळला, बोट जप्तीसह 11 खलाशी जेरबंद; तटरक्षक दलाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT