Sao Joao Goa 2025 Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Sao Joao Festival: विहिरींमध्ये उड्या मारून सांजाव साजरे करणारे, गोवा जगातील एकमेव ठिकाण

Sao Joao Goa 2025: दरवर्षी 24 जून रोजी सेंट जॉन द बाप्तिस्त यांच्या सन्मानार्थ कॅथलिक बांधव हा उत्सव साजरा करतात. पावसाने भरलेल्या विहिरीत तसेच जलाशयात उड्या मारणे हा या दिवसाचा आनंदी उपक्रम असतो.

Sameer Panditrao

कॅथलिक कुटुंबे या उत्सवाचे आतुरतेने वाट पाहतात त्याचे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे या उत्सवाच्या निमित्ताने स्वयंपाक घरात शिजणारे पदार्थ. आदमास, सोर्पोतेल, पातोळ्या, मुटल्या, आटोळे, फणसाचे मांडोस या पाककृती अनेक घरांत या सणाच्या निमित्ताने शिजताना दिसतील. पारंपरिक स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद ही गोमंतकीय सांजावची परंपरा आहे.

आज गोव्यात सांजाव साजरा होत आहे. दरवर्षी 24 जून रोजी सेंट जॉन द बाप्तिस्त यांच्या सन्मानार्थ कॅथलिक बांधव हा उत्सव साजरा करतात. पावसाने भरलेल्या विहिरीत तसेच जलाशयात उड्या मारणे हा या दिवसाचा आनंदी उपक्रम असतो. एलिझाबेथच्या गर्भात बालक जॉनने केलेल्या प्रवेशाचे (घेतलेल्या उडीचे) ते प्रतिकात्मक साजरीकरण असते.  पारंपारिक संगीत, नृत्य आणि डोक्यावर धारण केलेला फुलांचा मुकुट (कोपेल) हे या खऱ्याखुऱ्या रंगीबिरंगी उत्सवाचे भाग असतात.

सेंट जॉन द बाप्तिस्त यांच्या स्मृतिनिमित्त होणारा हा उत्सव संपूर्ण कॅथलिक जगामध्ये एकाच दिवशी साजरा केला जात असला तरी गोवा हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे विहिरींमध्ये उड्या मारून हा उत्सव अधिक रोमांचकारी बनवला जातो. 

सांजाव उत्सवाला शतकांची परंपरा असली तरी उत्तर गोव्यातील शिवोली या गावातील नदीतून रंगीबेरंगी सजवलेल्या होड्यांची निघणारी वैशिष्ट्यपूर्ण (आणि आता संपूर्ण जगात प्रसिद्ध झालेली) मिरवणूक ही सुमारे 175 वर्षांपूर्वी म्हणजेच तुलनेने अलीकडच्या काळात सुरू झालेली परंपरा आहे. हणजुणे, बादे आणि शिवोली या गावांतील होड्या दरवर्षी अगदी सजूनधजून नदीतून शिवोली येथील परेरा वाड्यावर पोहोचतात आणि तिथल्या सां जुआंव चॅपेलमध्ये आपली आदरांजली वाहतात.

सांजावच्या निमित्ताने आयोजित होणारी शिवोलीतील होड्यांची मिरवणूक अलीकडच्या काळात गोवा सरकारचा पर्यटन विभाग आणि पारंपारिक होडी महोत्सव आणि सांस्कृतिक संस्था मिळून आयोजित करतात. दुपारनंतर सुरू होणारा हा कार्यक्रम रंग, संगीत, परंपरा आणि लोकांच्या आनंदी भावना यांचे उत्सवी मिश्रण असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT