nandan kunkalikar folk art  Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Folk Art: गोव्याची लोककला 'तरुणांनी' आपणहून स्वीकारायला हवी; कुंकळ्ळीच्या कलाकाराची आर्त हाक

Goa Folk Art: 'अनप्लग्ड फोक' सारख्या संगीत कार्यक्रमातून लोकसंगीताचे एक वेगळे रूप लोकांसमोर आले आहे. लोकसंगीताचे स्वरूप जाणून घेऊनच संगीतकारानी ते अनोख्या प्रकारे सादर केले आहे.

Sameer Panditrao

माझे आजोबा, माझे वडील हे पूर्वीपासून लोककला सादरीकरणात सहभागी होत आले आहेत. शिमगोत्सवाच्या काळात ते वेगवेगळ्या पथकांमधून लोककला सादरीकरणात भाग घेत असत. त्यांना पाहून मला देखील लोककलांबद्दल आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मी लोककला शिकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पथकांमधून लोककला सादर केल्यानंतर मी माझ्या कुंकळ्ळी गावात माझे स्वतःचे पथक तयार केले. आमच्या पथकांमार्फत आम्ही लोककला कार्यशाळाही आयोजित केल्या आहेत. 

एक व्यक्ती म्हणून मला लोककलेने खूप काही दिले आहे. लोककलेसाठी स्वतःला वाहून घेताना आपोआपच मी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिलेलो आहे.‌ लोककलांमधील वेगवेगळे प्रकार, वेगवेगळी वाद्य शिकून घेताना मी मानसिकरित्या इतका व्यस्त राहिलो की लोककला हाच माझा 'फोकस' बनला. लोककलांना आपण गृहीत धरले आहे पण वेळेचे व्यवस्थापन, सराव, शिस्त या साऱ्या बाबी लोककला कलाकारांसाठी देखील महत्त्वाच्या असतात तसेच इतर कोणत्याही कलेप्रमाणेच लोककलाही तुम्हाला लोकांमध्ये एक स्थान अवश्य देत असते. 

लोककलेचा  पाया न ढळू देता, लोककलेत आज वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. 'अनप्लग्ड फोक' सारख्या संगीत कार्यक्रमातून लोकसंगीताचे एक वेगळे रूप लोकांसमोर आले आहे. लोकसंगीताचे स्वरूप जाणून घेऊनच संगीतकारानी ते अनोख्या प्रकारे सादर केले आहे. लोककलेच्या किंवा लोकसंगीताच्या मुळाला किंवा त्याच्या अस्सलतेला कुठल्याही प्रकारची हानी न करता अशा प्रकारचे प्रयोग होत असतील तर त्यांचे स्वागतच व्हायला हवे.

विशिष्ट प्रकारची लोककला आपल्याला विशिष्ट भागातच अनुभवायला किंवा पाहायला मिळते. मुळात ती त्या त्या जागेवरच जन्मलेली असते. उदाहरणार्थ, घोडेमोडणी हा प्रकार डिचोली तालुक्यातील सर्वण या गावातील आहे. पण आज हा प्रकार अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कलाकारांकडून सादर केला जातो. आज विशिष्ट लोककला विशिष्ट समाजाची मक्तेदारी राहिलेली नाही ही चांगलीच गोष्ट आहे. कोणतीही कला ही विशिष्ट समुदायापुरती किंवा प्रदेशापुरती मर्यादित राहता कामा नये असे मला व्यक्तिशः वाटते. गोव्याची लोककला किंवा लोकवेद हा गोव्याच्या तरुणांनी आपणहून स्वीकारायला हवा. मी स्वतः अनेक कार्यशाळेतून अनेक मुलांना लोककलांचे धडे दिले आहेत. 

जर लोककला समुदायापुरती किंवा जागेपुरती मर्यादित राहिली तर त्याचा आवाका देखील मर्यादित असेल. लोककलांमधून काही नवीन जन्माला यायचे असेल तर ती इतर ठिकाणीही पोहोचायला हवी. त्याची कलात्मक क्षमता जर इतरांच्या लक्षात आली तर त्यांनाही त्या कलेबद्दल प्रेम निर्माण होऊ शकते आणि ते या कलेची पाळेमुळे समजून घेण्यात रसही दाखवू शकतात. मी तर आजच्या तरुणांना लोककला शिकून घ्या असे आवर्जून सांगेन. लोककलांचे विकृतीकरण टाळण्यासाठी ते सखोलतेने शिकणे गरजेचेच आहे. लोककलांची शुद्धता राखणे त्यातूनच शक्य होईल. 

- नंदन कुंकळयेकर

लोककलाकार, संघटक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT