Nandi Bail, Lord Mahadeva X
गोंयची संस्कृताय

Story of Nandi: भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला, नंदीचे अर्धा बैल - अर्ध्या माणसात रूपांतर झाले..

Nandi Became Nandi : बेंदूर हा शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील नातेसंबंधाचा उत्सव आहे. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना विश्रांती दिली जाते.

Sameer Panditrao

Who Is Nandi : बेंदूर हा शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील नातेसंबंधाचा उत्सव आहे. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना विश्रांती दिली जाते. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा महत्वाचा दिवस आहे.

बैल कृषीव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. तसेच पुराण कालापासून बैलाला आपल्या जीवनव्यवस्थेत महत्वाचे स्थान आहे. भगवान शंकराचे वाहन असणारा नंदी हा या स्थानाला अधोरेखित करतो. नंदी हे महादेवाचे प्रिय आणि विश्वासू वाहन मानले जातात. कोणत्याही शिवमंदिरात प्रवेश करण्याआधी नंदीचे दर्शन घेतल्यांनंतरच शिवलिंगाचे आणि शंकराच्या मूर्तीचे दर्शन घेतले जाते. नंदीबैल आणि भगवान शंकराबाबत आपण अधिक माहिती घेऊ.

संदर्भ

‘नंदी’ हा शब्द संस्कृतमधील आहे आणि त्याचा अर्थ आनंद, प्रसन्नता असा होतो. काही नोंदींनुसार ‘नंदी’ हा शब्द प्राचीन तमिळ शब्द “नंदू” पासून आला असून त्याचा अर्थ बैल असा आहे. तमिळ संस्कृतीत बैल हे वीरता, मर्दानगी आणि शक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणूनच भगवान शंकराशी त्याचा संदर्भ जोडला गेला आहे.

मूळ पौराणिक कथा

एकदा शिलाद नावाचे एक तपस्वी ऋषी दीर्घ तपश्चर्या करत होते. त्यांना अमर पुत्र हवा होता. त्यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन इंद्रदेव प्रकट झाले, परंतु अमरत्वाचे वरदान केवळ महादेवच देऊ शकतात, असे सांगून त्यांनी शिलाद ऋषींना शिवाची आराधना करण्याचा सल्ला दिला.

शिलाद ऋषींनी पुढील १,००० वर्षे प्रचंड कठोर तप केले. इतके की त्यांच्या शरीरावर वाळवी बसू लागली. शरीरातील मांस झडून फक्त हाडे उरली. अखेर महादेव प्रकट झाले. त्यांनी स्पर्शाने शिलाद ऋषींना पूर्ववत केलं आणि त्यांना पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं.

ऋषींच्या यज्ञकुंडातून एक तेजस्वी बालक प्रकट झाला. त्याचं शरीर हिर्‍यांच्या कवचाने आच्छादलेलं होतं. त्या क्षणी देवगणांनी पुष्पवृष्टी केली आणि गंधर्व-अप्सरा गाणे-नृत्य करायला लागले. या दिव्य बालकाचं नाव ‘नंदी’ ठेवलं गेलं – अर्थात जो आनंद आणतो असा व्यक्ती.

शिलाद ऋषींनी नंदीचा योग्य प्रकारे पालनपोषण केलं. सातव्या वर्षी नंदी वेद-शास्त्रात पारंगत झाला. पण एके दिवशी मित्र आणि वरुण हे देव घरी आले. त्यांनी बालकाकडे पाहून सांगितले की, याचे जीवन फक्त आठव्या वर्षापर्यंतच मर्यादित आहे.

हे ऐकून शिलाद ऋषी दुःखी झाले. पित्याच्या दुःखाने व्यथित होऊन नंदीने महादेवांची मनोभावे प्रार्थना सुरू केली. शेवटी शंकर प्रकट झाले. त्यांनी नंदीला अमरत्वाचे वरदान दिले. एक रुद्राक्षांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले. शंकरांचे पूर्वापार वाहन बैल होते.

त्या क्षणापासून नंदीने अर्धबैल-अर्धमानवाचे दिव्य रूप धारण केले. त्याला अपार शक्ती प्राप्त झाली आणि तो शिवाचा नित्यसंगिनी झाला. शंकरानी त्याला सर्व गणांचा मुख्य ठरवले. तेंव्हापासून नंदीबैलाच्या भक्तीची, सचोटीची गोष्ट प्रसिद्ध झाली आणि नंदीबैलाचे पूजन होऊ लागले.

नंदी बैल

नंदी बैलाचा अवतार हा मानव प्राणी सहजीवनाचा महत्वाचा अवतार आहे. त्याची कथा धैर्य, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे ज्याने आपल्या भक्तीच्या बळावर शिवाचे अर्थात महान शक्तीचे हृदय जिंकले. नंदीचा प्रवास म्हणजे एका सामान्य व्यक्तीपासून एका दिव्य, चिरंतन शक्तीच्या प्रतीकापर्यंतचा प्रवास आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT