Ganesh Chitrashala Parcem  Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

Ganesh Chaturthi: गवंडीवाडा- पार्से येथील भानुदास गवंडी यांचं पूर्ण कुटुंब या दिवसात आपल्या चित्रशाळेत कलाविष्कारात रमलेले दिसते. भानुदास गवंडी हे आपल्या वडिलांची चित्रशाळा चालवतात.

Sameer Panditrao

गवंडीवाडा- पार्से येथील भानुदास गवंडी यांचं पूर्ण कुटुंब या दिवसात आपल्या चित्रशाळेत कलाविष्कारात रमलेले दिसते. भानुदास गवंडी हे आपल्या वडिलांची चित्रशाळा चालवतात. त्यांची पत्नी बिंदिया गवंडी व कन्या श्रद्धा गवंडी या त्यांच्याबरोबर मूर्तीकलेत समरस झालेली असतात.

एखादे संपूर्ण कुटुंब चित्रकलेत, मूर्तीकलेत रमलेले आहे असे चित्र क्वचितच पाहायला मिळते. परंतु गवंडीवाडा येथील ‘श्रद्धा गणपती चित्रशाळे’ला भेट दिली तर आपल्याला तिथं पूर्ण कुटुंब मातीपासून गणपती बनवण्याच्या कामात रंगलेले दिसून येईल. या चित्रशाळेत तीनशेच्या आसपास मूर्ती तयार होतात.

भानुदास गवंडी

गेली तीस वर्षे या चित्रशाळेमध्ये मी काम करतो आहे. माझ्या वडिलांच्या या चित्रशाळेत आता माझी पत्नी बिंदिया व मुलगी श्रद्धा देखील अथक परिश्रम घेऊन वेगवेगळ्या आकाराच्या मूर्ती बनवतात. आम्ही आमच्या मुलीवर कधी या चित्रशाळेमध्ये काम कर असा दबाव आणला नाही. तिलाच मातीची आवड झाली आणि ती उच्चशिक्षित असूनही या कामात उतरली.

बिंदिया गवंडी

माझे सासरे गणेश मूर्ती करायचे. त्यांच्या कामाचे निरीक्षण करत त्यांच्याकडून गणपती तयार करण्याचं मार्गदर्शन मी घेतलं. त्यानंतर माझे पती भानुदास गवंडी यांनीही मला मार्गदर्शन दिले. आमच्या चित्रशाळेतून वेगवेगळ्या गावात मूर्ती नेल्या जातात. शिवाय मागच्या अनेक वर्षापासून आम्ही म्हापसा  येथेही गणेश मूर्ती विक्रीला ठेवतो. ही पारंपारिक कला पुढील पिढी टिकवणार असा विश्वास मला वाटतो.

श्रद्धा गवंडी

कलेची जर मनापासून आवड असेल तर आपण त्या कलेला नक्कीच वेळ देऊ शकतो. या चित्रशाळेला मी पूर्वी मोठ्या प्रमाणात वेळ देत असे. आता लग्न झाल्यानंतर शनिवारी, रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मी या चित्रशाळेत येऊन काम करते.

प्रत्येक कलाकाराला आपल्याला पुरस्कार मिळावा असे वाटत असते परंतु पुरस्कार सगळ्यांनाच मिळत नाही मात्र प्रेक्षकांची दाद आणि थाप अवश्य मिळते. कलेला कुठेच अपयश नसते. आम्ही पुरस्कार मिळावे म्हणून या क्षेत्रात कार्यरत नाहीत. ही पारंपारिक कला आहे आणि त्या कलेला यशोशिखरावर पोहोचावे म्हणून आम्ही या क्षेत्रात आहोत. ही कला सहज शिकता येत नाही. ती पाहून व काम करून शिकावी लागते, आत्मसात करावी लागते आणि त्यानंतरच आपण मातीला आकार देऊन मुर्ती तयार करू शकतो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतीय तटरक्षक दलाला सलाम...! अरबी समुद्रात बहादुरी गाजवत ईराणी मच्छीमाराला यशस्वीरित्या वाचवले; गोव्यात यशस्वी उपचार VIDEO

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

SCROLL FOR NEXT