Ganesh Chaturthi 2025 Date and Time: भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा पवित्र सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. यंदा ही शुभ तिथी २७ ऑगस्ट रोजी येत आहे. जर तुम्हीही आपल्या घरात गणपती बाप्पाला आणणार असाल, तर काही महत्त्वाचे नियम आणि विधी जाणून घेणे आवश्यक आहे. योग्य विधी आणि नियमांचे पालन करून गणपतीची मूर्ती घरात स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते.
गणेश चतुर्थीला मध्यान्ह काळात गणपती बाप्पाचा जन्म झाला, असे मानले जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी 'अभिजीत मुहूर्त'मध्येच मूर्तीची स्थापना करणे शुभ मानले जाते. यावर्षी सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २० मिनिटांपर्यंत हा शुभ काळ आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर गणपतीची मूर्ती घरी आणावी. मूर्तीला घरी आणताना तिच्या डोळ्यांवर लाल रंगाचे स्वच्छ कापड बांधावे. वाजत-गाजत आणि पुष्पवृष्टी करत बाप्पाचे स्वागत करावे आणि जयघोष करत त्यांना घरात प्रवेश द्यावा.
गणपतीची मूर्ती उत्तर दिशेला स्थापित करणे सर्वात उत्तम मानले जाते. मूर्तीचा मागील भाग तुमच्यासमोर न येता, केवळ समोरचा भाग दिसला पाहिजे. मूर्ती ठेवण्याच्या ठिकाणी स्वस्तिक काढून त्यावर अक्षता आणि फुले वाहावीत.
गणेशोत्सव साधारणपणे ११ दिवसांचा असतो. १० दिवस गणपतीची मूर्ती ठेवल्यानंतर ११ व्या दिवशी विसर्जन केले जाते. याव्यतिरिक्त, दीड, ५, ७, ११ किंवा २१ दिवसांसाठीही गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित केली जाते.
सर्वप्रथम, मूर्ती स्थापन करण्याचे ठिकाण स्वच्छ करून सजवावे आणि गंगाजल शिंपडावे. लाकडी पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर स्वस्तिक काढावे. मूर्तीसोबतच कलश स्थापना पूर्व दिशेला करावी. त्यानंतर गणपतीच्या मंत्राचा जप करावा.
फुले, धूप, दीप इत्यादींनी गणपतीची पूजा करावी. शेवटी तुपाचा दिवा लावून आरती करावी. गणपतीला तुपाचे २१ मोदक अर्पण करून ते सर्वांमध्ये वाटावे. व्रत ठेवणाऱ्यांनी सकाळी हातात अक्षता आणि फुले घेऊन 'मम सर्वकर्मसिद्धये सिद्धिविनायकपूजनमहं करिष्ये' या मंत्राचा जप करत संकल्पा घ्यावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.