Sangodd Festival Cumbarjua | Sangod Utsav Goa | Sangodotsav Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Sangodotsav: शेकडो वर्षांची परंपरा असलेला कुंभारजुवेतील 'सांगोडोत्सव'! मांडवी नदी सजणार; चित्ररथांची स्पर्धा रंगणार

Sangodd Festival Cumbarjua: मंगळवार २ सप्टेंबर रोजी, म्हणजे संध्याकाळी ४ वा. कुंभारजुवेतील मांडवी नदीच्या पात्रात हा उत्सव उत्साहात साजरा होताना दिसेल.

Sameer Panditrao

मांडवी नदीच्या पात्रातील कुंभारजुवे गावात दरवर्षी साजरा होणारा सांगोडोत्सव हा एक अद्वितीय जल-उत्सव आहे. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या प्राकारात साजरा होणार्‍या गणेशोत्सवाचा तो अविभाज्य भाग मानला जातो. यंदा मंगळवार २ सप्टेंबर रोजी, म्हणजे आज संध्याकाळी ४ वा. कुंभारजुवेतील मांडवी नदीच्या पात्रात हा उत्सव उत्साहात साजरा होताना दिसेल. 

कुंभारजुवे गावातील सात दिवसांच्या या परंपरागत सांगोड उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी केला जाणारा शांतादुर्गा कुंभाराजुवेकरीणीचा हा सांगोडोत्सव गोमंतकामध्ये प्रसिद्ध आहे. या उत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर आधारून तयार केलेले चित्ररथ मांडवी नदीचे पात्र व्यापून टाकतात. हे चित्ररथ बनवण्यासाठी या परिसरातील कलाकार अनेक दिवस तनामनाने वावरत असतात. आपला चित्ररथ आकर्षक कसा होईल याकडे प्रत्येकाचा कल असतो.

दरवर्षी श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीणीच्या मंदिरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्ती पूजेला लावली जाते व सातव्या दिवशी त्याचे मोठ्या उत्साहाने विसर्जन केले जाते. सनई-चौघड्याच्या मंजूळ वादनाच्या साथीने श्री गणेशाची मूर्ती माशेलमधील तारीवाड्यावर पोहोचल्यानंतर पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या सांगोडात ठेवली जाते.

‘देवते पाव गे’, ''श्री शांतादुर्गा माता की जय’ अशा जयघोषाने देवतेच्या सांगोडोत्सवाला सुरुवात होते. सांगोडावर रिद्धी, सिद्धी, शंकासूर, वेताळ अशी सोंगे घेतलेले ग्रामस्थ उपस्थित असतात. श्री गणेशाची मूर्ती सांगोडात बसून नदीत निघाल्यानंतर त्या सांगोडासमवेत इतरही चित्ररथांचे सांगोडही श्रींच्या मिरवणुकीत सहभागी होतात. या चित्ररथांची स्पर्धाही होते.

गावातील सात दिवसाच्या गणेशमूर्तीसुद्धा विसर्जनासाठी इथे आणल्या जातात. इथल्या विसर्जन सोहळ्यातही एक आगळी पारंपरिकता आढळून येते. अशा विविधरंगी पारंपारिकतेमुळे गोमंतकामध्ये गणेश विसर्जनालासुद्धा किती महत्त्वाचे स्थान आहे हे दिसून येते. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण पारंपरिक सांगडोत्सव सर्व गोमंतकामध्ये प्रसिद्ध असल्याने भक्तजनांची, कलाकारांची तसेच पाहणाऱ्यांची दोन्हीच्या दोन्ही बाजूला अलोट गर्दी असते. कुंभारजुवे पुलावरही भाविकांची मोठी गर्दी होते, अलीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, पंचायतीतर्फे हा उत्सव साजरा केला जातो. सांगोडोत्सवात विजयी चित्ररथांना आकर्षक पारितोषिकेही दिली जातात.  

‘सांगोड’ म्हणजे काय?

सांगोड तयार करण्यासाठी दोन होड्या किंवा नावा एकत्र बांधल्या जातात व त्यावर आकर्षक चित्ररथ साकारला जातो. गणेशमूर्तीसह कलाकार मंडळी पारंपरिक वेशभूषेत तिथे आपली कला सादर करतात. हा उत्सव पर्यटकांनीही आकर्षित करत असल्यामुळे पर्यटकांचीही उपस्थिती या ठिकाणी असते.

कसे जाल?

१. जुने गोवे-गवंडाळी पूलमार्गे कुंभारजुवे,

२. बाणास्तरी-माशेलमार्गे कुंभारजुवे,

३. सारमानस-टोंक फेरीमार्गे- खांडोळा महाविद्यालय- कुंभारजुवे,

४. आमोणा - माशेल- कुंभारजुवे अशा मार्गाने अवघ्या पंधरा- वीस मिनिटात सांगोडोत्सव पाहण्यासाठी येणे शक्य आहे. (गवंडाळी मार्गे रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहने सावकाश हाकावी लागतात.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT