Sangodd Festival: उजळलेले दिवे, सजवलेल्या होड्या! गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग; कुंभारजुवेतील सांगोडोत्सव रंगणार मंगळवारी

Sangod Utsav Goa: गोव्यातील कुंभारजुवे गावात दरवर्षी साजरा होणारा सांगोडोत्सव हा एक अद्वितीय जल-उत्सव आहे. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या गणेशोत्सवाचा तो अविभाज्य भाग मानला जातो.
Sangodd Festival Cumbarjua | Sangod Utsav Goa | Sangodotsav
Sangodd Festival Cumbarjua | Sangod Utsav Goa | SangodotsavDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: गोव्यातील कुंभारजुवे गावात दरवर्षी साजरा होणारा सांगोडोत्सव हा एक अद्वितीय जल-उत्सव आहे. श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या गणेशोत्सवाचा तो अविभाज्य भाग मानला जातो. मांडवी नदीच्या पात्रात हा उत्सव रंगतो.

यंदा मंगळवार २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४ वा. कुंभारजुवेतील मांडवी नदीच्या पात्रात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी शेट यांनी दिली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, आमदार राजेश फळदेसाई, गौरव कुडचडकर, डॉ. शिवाजी शेट, चंद्रशेखर फडते, सचिन गावडे, सुधीर फडते व इतर पंच मंडळी उपस्थित राहाणार आहेत.

Sangodd Festival Cumbarjua | Sangod Utsav Goa | Sangodotsav
Sangodd Festival 2024: देवते पाव गे! गणपती विसर्जनाच्या दिवशी रंगणाऱ्या 'सांगोडोत्सव'विषयी माहितीये का?

या उत्सवात सजवलेल्या होड्यांवर (सांगोड) पौराणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक घटनांचे देखावे सादर केले जातात. दिवे, सजावट, नृत्य-गीत आणि नाट्यरूपे यांच्या संगमामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने उजळून निघतो. स्थानिक कलाकार, महिला-पुरुष आणि लहान मुलेही या देखाव्यांत सहभागी होतात.

Sangodd Festival Cumbarjua | Sangod Utsav Goa | Sangodotsav
Cumbarjua Sangodd Utsav: कुंभारजुवे येथे सांगोड बुडाल्याने एकच गोंधळ! प्रसंगावधानामुळे भाविक बचावले

सात दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाच्या अखेरीस गणेशमूर्तींचे विसर्जन पारंपारिक रीतीने पालखीतून नेऊन नदीत केले जाते. धार्मिकता, लोककला आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर मिलाफ म्हणजे कुंभारजुवेचा सांगोडोत्सव असून उत्साहात मंगवारी साजरा करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com