Sarvona Shigmotsav Bicholim Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Sarvona Shigmotsav: ‘गावात पेटली होळी, विवाहितांवर आली देवळात झोपण्याची पाळी'! सर्वण गावातील अनोखी परंपरा..

Sarvona Shigmotsav Bicholim: प्रत्येक गावात त्या-त्या भागातील रीतीरिवाजांनुसार शिमगोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक प्रदेशातील या सणाला एखादे वेगळेपण किंवा खास वैशिष्ट्य लाभलेले असते.

Sameer Panditrao

प्रत्येक गावात त्या-त्या भागातील रीतीरिवाजांनुसार शिमगोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक प्रदेशातील या सणाला एखादे वेगळेपण किंवा खास वैशिष्ट्य लाभलेले असते. डिचोली तालुक्यातील सर्वण गावातही शिमगोत्सवाची अशीच एक आगळीवेगळी परंपरा आजही जपली जाते.

या गावात होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सलग तीन रात्री गावातील विवाहित पुरुषांना घराबाहेर, म्हणजेच देवळात मुक्काम करावा लागतो. सर्वण येथील श्री श्यामपुरुष देवळात ही प्रथा पूर्वापार चालत आली असून आजही ती त्याच उत्साहाने पाळली जाते. विवाहित पुरुष मोठ्या उमेदीने देवळात एकत्र येऊन तीन रात्रींचा सामूहिक मुक्काम करतात. ही परंपरा पाहिली की, ‘गावात पेटली होळी आणि विवाहितांवर आली देवळात झोपण्याची पाळी,’ असेच म्हणावे लागते.

होळी पेटविल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रथा सुरू होते. सलग तीन रात्री गावातील विवाहित पुरुष श्री श्यामपुरुष मंदिरात एकत्र जमतात आणि तेथेच झोपतात. यंदा मंगळवारपासून या प्रथेला प्रारंभ झाला असून गुरुवारपर्यंत विवाहित पुरुषांचा देवळात मुक्काम असणार आहे.

अनुपस्थितीला दंड

एखाद्या विवाहिताने जाणूनबुजून मंदिरात येणे टाळल्यास, देवळात जमलेले ग्रामस्थ त्याच्या घरी जातात. घरातील मंडळी जागी होईपर्यंत घरासमोर ढोल-ताशांचा गजर केला जातो आणि संबंधित व्यक्तीकडून ठराविक दंड वसूल केला जातो. आजारपण किंवा अन्य कारणांमुळे येणे शक्य नसल्यास काहीजण आगाऊ दंड भरतात. याशिवाय, पहिल्या रात्री ज्या जागी झोपले, त्याच जागेवर पुढील दोन रात्री झोपणे बंधनकारक आहे. चुकूनही जागा बदलल्यास दंड आकारला जातो.

ज्येष्ठांना सवलत

शिगमोत्सवाच्या काळात देवळात झोपण्याची ही परंपरा आजही तेवढ्याच काटेकोरपणे पाळली जात असली, तरी काळानुरूप काही बदल करण्यात आले आहेत. ज्यांचे वय ६० वर्षे पूर्ण झाले आहे किंवा ज्यांनी कन्यादान अथवा पुण्यवचन केले आहे, त्यांना झोपण्याच्या सक्तीपासून सवलत देण्यात आली आहे. सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी मात्र लग्न झालेले सर्वच पुरुष देवळात मुक्काम करत असत.

या प्रथेची सुरुवात नेमकी कशामुळे झाली, याबाबत आजही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. काही जाणकारांच्या मते, ‘होळी’ची राखण करण्यासाठी पूर्वी देवळात झोपण्याची पद्धत सुरू करण्यात आली असावी. मात्र पुढे ही जबाबदारी केवळ विवाहित पुरुषांवरच का ठेवली गेली, याबाबत विविध मते व्यक्त होत आहेत. प्रथेमागील कारण काहीही असो, या निमित्ताने गावातील एकोप्याची आणि सामूहिकतेची सुंदर प्रचीती येते, हे मात्र निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT